Home क्राईम तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, संशयितास अटक

तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, संशयितास अटक

Nashik Crime: लग्नाचे आमिष दाखवून एकाने मुंबईच्या तरूणीवर वारंवार बलात्कार (Rape) केल्याची घटना.

Rape of young woman by luring her for marriage, suspect arrested

नाशिक: लग्नाचे आमिष दाखवून एकाने मुंबईच्या तरूणीवर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशियीत आरोपीस अटक करण्यात आली आहे.

जुर्गन मॅक्सवेल रोझ (२७, रा. हरिओम फेज- २, पांडवनगरी, इंदिरानगर) असे संशियीत आरोपीचे नाव आहे. याबाबत पिडीत तरुणीने फिर्याद दाखल केली असून तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, जानेवारी २०२३ मध्ये पीडिता नवी मुंबई येथे एका खासगी कंपनीत काम करीत असतांना संशयिताशी ओळख झाली. दोघांच्या या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. कंपनी बंद पडल्यानंतर, पिडीतेने दुसऱ्या कंपनीत वर्क फॉर्म होम काम सुरू केले.

त्या दरम्यान तिच्या आई वडिलांचे आणि तिचे वाद झाल्याने तिला संशयिताने नाशिकला येवून वर्क फॉर्म होमचे काम करण्यास सांगितले. त्यामुळे पिडीता मार्च महिन्यात घरात कुणालाही काही एक न सांगता नाशिकला येऊन राहत होती.

संशयितासमवेत राहत असतांना त्याने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचे पिडीतेने तक्रारीत म्हटले आहे. पिडीतेने लग्नाचा तगादा लावला असता त्याने नकार दिल्याने तिने पोलिसात धाव घेतली. पुढील तपास उपनिरीक्षक मनिषा शिंदे करीत आहेत.

Web Title: Rape of young woman by luring her for marriage, suspect arrested

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here