Home महाराष्ट्र पोटच्या मुलीवर आधी लैंगिक अत्याचार, नंतर गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न

पोटच्या मुलीवर आधी लैंगिक अत्याचार, नंतर गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न

First sexual assault on a pregnant girl, then attempted manslaughter for secret money

यवतमाळ | Yavatmal: अंधश्रद्धा निर्मूलनाच्या मुद्द्यावर सातत्याने मोठ्या चर्चा होताना दिसून येत असताना मात्र  अशा घटना थांबण्याचे नाव घेत नाही. अद्यापही अशा प्रकारांना नागरिक बळी पडताना दिसून येत आहे. अशीच एक घटना  महाराष्ट्राच्या यवतमाळमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका बापानंच आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार (sexual assault) केल्याचा आणि नंतर तिला गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. मुलीनं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी नराधम बापासह एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

बाभूळगाव तालुक्यात ही संतापजनक घटना रविवारी रात्री उघडकीस आली. पोलीस वेळेत घटनास्थळी पोहोचल्याने नरबळीचा हा डाव उधळला गेला.

या प्रकरणी वाल्मिक रमेश वानखेडे (३३), विनोद नारायण चुनारकर (४२), दीपक मनोहर श्रीरामे (३१), आकाश शत्रूघन धनकसार (३४), माधुरी विजय ठाकूर (३०), माया प्रकाश संगमनेरकर (३५) सर्व रा. राळेगाव यांच्या विरोधात जादूटोणा विरोधी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाभूळगाव तालुक्यातील तरुणी यवतमाळमध्ये काकांकडे शिक्षणासाठी राहते. ही तरुणी १३ वर्षांची असल्यापासून सुट्टीत घरी आल्यावर आरोपी बाप तिच्यावर अत्याचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार तपासाअंती समोर आला आहे. विरोध केला तर आई व बहिणीसह जिवे मारून टाकण्याची धमकी वडिलांनी दिल्याचं देखील तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे.

१५ दिवसांपूर्वी प्रकृती ठीक नसल्यामुळे तरुणी औरंगाबाद येथून घरी आली. त्यावेळी आईची प्रकृती बिघडल्याने तिला यवतमाळ येथे रुग्णालयात भरती करण्यात आले. तिचे वडील दवाखान्यातच राहात होते. तरुणी लहान बहिणीसह घरी होती. आठ दिवसांपूर्वी आई दवाखान्यातून घरी आली. दरम्यान दोन ते तीन दिवसांपासून तरुणीचे वडील गुप्तधनाबाबत फोनवर काही लोकांबाबतचर्चा करीत होते. घरात वाद करीत तरुणीसह बहिणीला मारहाण करीत होते. २४ एप्रिल रोजी रात्री कामाच्या कारणावरून तरुणीच्या वडिलांनी दोन्ही बहिणींना मारहाण केली. ‘तुझ्या सारखी मुलगी जिवंत ठेऊन काहीच उपयोग नाही’, असं म्हटल्याचं देखील पोलीस तपासात समोर आलं आहे.

२५ एप्रिल रोजी सकाळपासून तरुणीचे वडील गुप्तधनाबाबत फोनवर बोलत होते. त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता वडिलांनी तरुणीस ‘तू आंघोळ करून तयार राहा, आपल्याकडे माणसं येणार आहेत’, असं बोलून घराच्या मागची खोली साफ केली. त्यानंतर रात्री ९ वाजेच्या सुमारास घरी गावातील विजय बावणे (४१), शेतात काम करणारा रमेश गुडेकार (५०) व बाहेरगावातील चार पुरुष व दोन महिला आल्या. सर्वजण मागच्या खोलीत गेले. त्यावेळी आई, लहान बहीण बाजूच्या खोलीत थांबून होते. वडिलांनी दरवाजा लावायला सांगितला व तू आता बाहेर यायचे नाही, तुझे येथे काम पडणार आहे, असे म्हटले. त्यानंतर चर्चा सुरू असताना त्यातील एकाने गुप्तधनासाठी एका व्यक्तीचा नरबळी आवश्यक आहे, असे म्हटले. वडिलांनी मोठ्या मुलीचा बळी देण्यास तयारी दर्शविली.

वारंवार वाल्मिक बाबा अशा नावाने मांत्रिकाला मुलीचे वडील हाका मारत होते. त्यांच्या बोलण्यातून ते सर्वजण राळेगाव येथून आल्याचे तरुणीच्या लक्षात आले. वडिलांनी बहीण, आई व तरुणीच्या हातात एक-एक लिंबू दिला आणि परत ते त्या खोलीत गेले. हा संपूर्ण प्रकार तरुणी लपून बघत होती. त्या दोन महिलांच्या हाताने जागेची पूजा करण्यात आली. वडिलांनी जबरदस्तीने तरुणीला त्या खोलीत नेले व तेथे सर्वांनी तरुणीची पूजा केली. गळ्यात फुलांचा हार टाकला. त्याचवेळी पोलीस आले व त्यांनी सर्व प्रकार थांबवून तरुणीचा जीव वाचवला.

सदर प्रकार सुरू असताना तरुणीने मोबाइलमध्ये लपून गुप्तधनासाठी खोदलेल्या खड्ड्याचा फोटो काढत यवतमाळ येथील मित्र सचिन मेश्राम याला फोटो पाठवून व ‘बळी जाण्याची शक्यता आहे. मला वाचव’ असा मेसेज केला. तरुणाने स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी कारवाई करत नरबळी जाण्यापासून वाचविले.

Web Title: First sexual assault on a pregnant girl, then attempted manslaughter for secret money

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here