Home अहमदनगर राज्यातील पाच जिल्ह्यांनी महाराष्ट्राची चिंता वाढली: राजेश टोपे

राज्यातील पाच जिल्ह्यांनी महाराष्ट्राची चिंता वाढली: राजेश टोपे

Five districts raised concerns in Maharashtra

मुंबई: गणेश चतुर्थी उत्सव समोर आला आहे. यामध्ये कोरोनाचे विघ्न पडू नये यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण गरजेचे आहे. अन्य राज्यांकडून आपण उदाहरण घेतलं पाहिजे. त्यामुळे लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

राजेश टोपे म्हणाले केरळ राज्यात ओनम सन झाल्यानंतर करोना संक्रमणात मोठी वाढ झाल्याचे आढळून आले आहे. केरळमध्ये भयंकर परीस्थिती आहे. दर दिवसाला ३० हजाराच्या आसपास रुग्ण आढळून येत आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील ५ जिल्ह्यांत कोरोना संक्रमण वाढत असल्याचे सांगितले आहे. यामध्ये मुंबई पुणेचा देखील समावेश आहे.

मुंबई, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे. या जिल्ह्यात बाधित संक्रमण अधिक होत आहे. राज्यातील एकूण संखेपैकी ७० टक्के या पाच जिल्ह्यात रुग्ण आढळून येत आहे. या जिल्ह्यात गणेशोत्सव उत्सहाने साजरा केला जातो. त्यामुळे संक्रमण अधिक होण्याची भीती निर्माण झाली आहे.

Web Title: Five districts raised concerns in Maharashtra

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here