Home Accident News अकोले: चितळवेढे घाटात प्रवासी जीप पलटी, पाच जण जखमी

अकोले: चितळवेढे घाटात प्रवासी जीप पलटी, पाच जण जखमी

Akole | अकोले: तालुक्यातील राजूर येथून प्रवाशांना अकोलेला घेऊन येणाऱ्या एका काळी पिवळी जीप गाडीचा चितळवेढे घाटात पहिल्या वळणावर समोरून येणाऱ्या बसला हुलकावणी देताना जीप चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.

या अपघातात दोन महिला, दोन मुले व एक पुरुष जखमी झाले आहेत. जखमींवर अकोले ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गुरुवारी दुपारी राजूरहून काळी पिवळी जीप क्रमांक एम.एच. १५ ई. २८३४ ही १७ प्रवासी घेय्न अकोलेकडे येत होती. चितळवेढे घाटात हा अपघात झाला. गाडी वळणावर पलटी होऊन प्रवासी जखमी झाले. जखमी झालेले प्रवासी जवळपास तासभर घटनास्थळीच पडून  होते. कमी जखमी वाहनाने निघून गेले तर गाडी चालक अपघात होताच फरार झाला. रुग्णवाहिकेतून जखमींना अकोले ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. जीप चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघात होताच चालक घटनास्थळावरून पसार झाला असल्याची माहिती प्रवासी गुलाब धोंगडे यांनी दिली.

Web Title: Five injured as passenger jeep overturns in Chitalvedhe ghat Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here