Home औरंगाबाद बिस्कीट आणण्यासाठी गेलेल्या पाच वर्षीय मुलीवर अत्याचार

बिस्कीट आणण्यासाठी गेलेल्या पाच वर्षीय मुलीवर अत्याचार

Aurangabad Crime: Minor girl assaulted, ५ वर्षीय चिमुकलीवर किराणा दुकानदारानेच अत्याचार केल्याची घटना 

five-year-old girl who went to fetch biscuits was assaulted

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील एका गावात खळबळजनक घटना समोरआली आहे. किराणा दुकानात बिस्कीट आणि पाव आणण्यासाठी गेलेल्या ५ वर्षीय चिमुकलीवर किराणा दुकानदारानेच अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

एका गावातील पाच वर्षीय चिमुकलीला आईने दुकानात बिस्‍कीट व पाव घेण्यासाठी पाठविले होते. मुलगी दुकानात गेली असता दुकानात कोणी नसल्‍याचे पाहून दुकानदाराने मुलीवर अत्‍याचार केला. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पाचोड पोलिसात गुन्हा दाखल केला असून सदर मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

लहान मुलीवर अत्‍याचार करणारा बळीराम असे नराधम आरोपीचे नाव आहे. या नराधमाला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: five-year-old girl who went to fetch biscuits was assaulted

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here