Home नांदेड अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये…..

अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये…..

Suicide: अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना.

student studying engineering commits suicide in the hostel

नांदेड: नांदेड येथील एसजीजीएस अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांना सुसाईड नोट मिळाली असून अद्याप तिने आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे समोर आले नाही.

नांदेडमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींनीने गळफास घेऊन  आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. गिता कदम असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. एसजीजीएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील अभियांत्रिकेच्‍या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या गिता कदम हिने प्रेम प्रकरणातून ही आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

गिता ही उस्मानाबाद जिल्ह्य़ातील रहिवासी आहे. गिताने वसतीगृहातच आत्महत्या केली आहे. तिच्याजवळ पोलिसांना एक सुसाइड नोट (Suicide Note) सापडली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावर भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी घटनास्थळावरुन सुसाइड नोट,  मोबाइल जप्त केले आहे. या प्रकरणात अद्याप पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली नसून, या प्रकरणाचा तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Web Title: student studying engineering commits suicide in the hostel

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here