Home अहमदनगर अल्पवयीन मुलीस विकत घेणाऱ्या शेवगाव येथील महिलेस अटक

अल्पवयीन मुलीस विकत घेणाऱ्या शेवगाव येथील महिलेस अटक

Ahmednagar: अल्पवयीन मुलीस विकत घेणाऱ्या शेवगाव येथील महिलेस अटक(Arrested).

a woman from Shevgaon was arrested for buying a minor girl

अहमदनगर: श्रीरामपूर येथील कुख्यात गुन्हेगार मुल्ला कटर व बाबा चंडवाल यांच्याकडून अल्पवयीन मुलीस विकत घेणाऱ्या शेवगाव येथील महिलेस पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने बुधवारी अटक केली.

मीनाबाई रूपचंद मुसवत असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. शेवगाव येथील नेवासा रोडवरील श्रीराम मंदिर भूखंडाच्या परिसरात तिच्या राहत्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांना पाहून तिने पळ काढला. त्यामुळे पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून तिचा शोध घेतला. ती उसाच्या शेतात लपली होती. तेथून तिला अटक केली. मुल्ला कटर याने अल्पवीयन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी प्रथम मुल्ला कटर याच्यासह चार आरोपींना अटक केली आहे.

पोलीस तपासात मुल्ला कटर याने अत्याचार केलेल्या मुलीला बाबा चंडवाल याच्या मार्फत शेवगाव येथे कुंटणखाना चालविणाऱ्या मीनाबाई मुसवत हिला विकल्याचे समोर आले. त्यानंतर उपअधीक्षक मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: a woman from Shevgaon was arrested for buying a minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here