Home संगमनेर घारगाव ते अकोले आजपासून पायी मोर्चा

घारगाव ते अकोले आजपासून पायी मोर्चा

Breaking News | Sangamner: संगमनेरच्या पठार भागात वंचित व दुर्लक्षितांच्या विकासासाठी पायी मोर्चा.

Foot march from Ghargaon to Akole from today

घारगाव : अकोलेसह संगमनेरच्या पठार भागात वंचित व दुर्लक्षितांच्या विकासासाठी विकास क्रांती सेनेचे समन्वयक व शेतकरी विविध मागण्यांसाठी घारगाव ते अकोले तहसील कार्यालयापर्यंत ४ दिवसांच्या मुक्कामासह पायी जाणार आहेत. आज (सोमवार दि. ८ जानेवारी) सकाळी ९ वाजता घारगाव बसस्टँडवरून मोर्चा निघणार आहे.

पहिला मुक्काम बेलापूर (बदगी) गावात होणार आहे. मंगळवार दि. ९ रोजी दुसरा मुक्काम ब्राम्- हणवाडा गावात होणार आहे. बुधवारी तिसरा मुक्काम कोतुळ गावात होईल. गुरूवारी चौथा मुक्काम अकोले तहसील कार्यालय येथे होईल. शुक्रवार सकाळी अकोले तहसिलदारांना मागण्यांचे निवेदन देऊन विकास क्रांती सेना म्हणणे मांडणार आहे.

अकोले व संगमनेर तालुक्याच्या पठार भागास विविध मागण्या केल्या आहेत. बोटा ते राजूर राज्य मार्ग क्र. २३ रस्त्याचे दुपदरीकरण करावे. पर्यटन विकासासाठी इतर राज्य मार्गांचे दुपदरी करणे, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गात बोटा रेल्वे स्टेशन करावे, हा मार्ग अकोले तालुक्यातुन गेला पाहिजे. चिल्- हेवाडी धरणातुन जल उपसा करुन कचनदी बारामही करावी, घारगाव तालुका निर्मिती करावी आदी मागण्या केल्या आहेत.

Web Title: Foot march from Ghargaon to Akole from today

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here