Home संगमनेर देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने- संगमनेरात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे मोदी सरकारवर टीकास्त्र

देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने- संगमनेरात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे मोदी सरकारवर टीकास्त्र

Breaking News:  देशाची लोकशाही टिकवण्यासाठी सर्वांनी एक होऊन लढा देणे गरजेचे आहे. नाहीतर पुन्हा एकदा देशाची सत्ता नरेंद्र मोदींच्या हातात सत्ता दिली तर देशाची लोकशाही धोक्यात (Chief Minister Siddaramaiah’s criticism of Modi government).

Chief Minister Siddaramaiah's criticism of Modi government

संगमनेर: ब्रिटीशांच्या तावडीतून देशाला खऱ्या अर्थाने वाचविण्यासाठी काँग्रेस पक्ष सोडून दुसऱ्या कुठल्याच राजकीय पक्षाने काम केले नाही. काँग्रेसमुळेच देशाची लोकशाही अन् संविधान अबाधित होते. मात्र केंद्रात असलेले सध्याचे भाजपचे सरकार लोकशाहीच्या विरोधात आहे. त्यामुळे देशाची लोकशाही टिकवण्यासाठी सर्वांनी एक होऊन लढा देणे गरजेचे आहे. नाहीतर पुन्हा एकदा देशाची सत्ता नरेंद्र मोदींच्या हातात सत्ता दिली तर देशाची लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केली.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरितक्रांतीचे प्रणेते अण्णासाहेब शिंदे यांच्याजयंती निमित्त कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते ज्येष्ठ नेते उल्हास पवार, जळगाव येथील जैन उद्योग समूहाचे प्रमुख अशोक जैन आणि करवीरचे (जि. कोल्हापूर) आमदार पो. एन. पाटील यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्व रािज चव्हाण अध्यक्षस्थानी होते, व्यासपीठावर रमेश चेन्नीथला,

राष्ट्रवादीचे नेते आ. जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे नेते माजी मंत्री भास्कर जाधव, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, माजी मंत्री मधुकर चव्हाण, डॉ. विश्वजित कदम, आ. रवींद्र चंगेकर, आ. झिशन सिद्द‌की, आ. सत्यजित तांबे, आ. लहू कानडे, आ. हिरामण खोसकर, आ. शिरीष चौधरी, आ. राजेश राठोड, माजी आ. डॉ सुधीर तांबे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, कांचन थोरात, दुर्गा  तांबे, बाजीराव खेमनर, रणजित देशमुख, इंद्रजित थोरात, माजी आमदार मोहन जोशी, नामदेव पवार, उपस्थित होते. आदी

मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, की सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी संपूर्ण सहकार वाढवला आणि टिकवला; परंतु सध्या केंद्रातील सहकार खाते अमित शहा यांच्याकडे असल्यामुळे केंद्र सरकार राज्याच्या सहकारात ढवळाढवळ करत आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे आणण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे त्यांना झुकावे लागले. त्यामुळे या सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन लढा देणे गरजेचे आहे. भाजप वसाहतवाद आणत आहे. हे देशाच्या दृष्टीने घातक आहे. सहकार चळवळ ग्रामीण भागाला सशक्त बनवत आहे; मात्र केंद्र सरकार सहकार चळवळ मोडीत काढू पाहत आहे. सध्या राज्याचे सर्व अधिकार केंद्राने ताब्यात घेतले आहेत, भारतीय जनता पार्टी ही भ्रष्ट पार्टी असून कर्नाटकमध्ये ४० टक्के कमिशन घेत होते. त्यामुळे जनतेने त्यांचा मोठा पराभव केला, कर्नाटकात काँग्रेसने पाच कलमी विकास योजना जाहीर केला आणि अंमलबजावणीची हमी दिली. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर आली. महाराष्ट्रातसुद्धा काँग्रेसने विधानसभा निवडणुकीपूर्वी पाचकलमी विकास योजना जाहीर करावी आणि सत्तेवर आल्यानंतर त्या योजनांची अंमलबजावणी करावी, असा सल्ला त्यांनी काँग्रेस नेत्यांना दिला.

आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आपण कायम गांधीवादी विचार जपला असून जिवंत आहे तोपर्यंत हा विचार सोडणार नाही. देशाचा कोणताही पंतप्रधान दुसन्या देशात जातो तेव्हा महात्मा गांधी यांचेच नाव सांगतो. मीही कायम निष्ठा जपली आहे. बापाला घरी बसा असे सांगणारे काही लोक आहेत.

Web Title: towards dictatorship- Sangamner at Chief Minister Siddaramaiah’s criticism of Modi government

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here