Home अकोले कोव्हीड रुग्णांसाठी मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधांबाबत अकोले तहसील समोर ठिय्या आंदोलन

कोव्हीड रुग्णांसाठी मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधांबाबत अकोले तहसील समोर ठिय्या आंदोलन

For Corona Services agitation in front of Akole tehsil

अकोले | Akole: अकोले तालुक्यात तहसील कार्यालयासमोर कोव्हीड रुग्णांसाठी मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधांबाबत सर्व राजकीय पक्ष,सर्व सामाजिक संघटना, अकोले तालुका मेडिकल असोसिएशन व सामाजिक कार्यकर्त नागरिक ठिय्या आंदोलन केले असून मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार असल्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे.

या आंदोलनाचे प्रतिनिधित्व डॉ. अजित नवले हे करीत आहे. आज दुपारी १ वाजेपासून हे आंदोलन सुरु आहेत. या आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांनी व नागरिकांनी सहभाग घेतला आहे.

या आंदोलनातील प्रमुख मागण्याचे निवेदन तहसीलदारांसमोर मांडण्यात आले आहे. यातील प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे:

  • कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असणारे रेमेडीसिवीर, फ्याबुलीप, ऑक्सिजन व इतर साहित्य, औषधे अकोले तालुक्यातील सर्व रुग्णांसाठी पुरेशा पप्रमाणात उपलब्ध करून द्यावेत.
  • दिनांक १५ एप्रिल २०२१ रोजी संगमनेर प्रांत कार्यालयात ४८२ रेमेडीसिवीर इंजेक्शन वितरण झाले. अकोले व संगमनेर तालुक्यात साधारणतः कोविड रुग्णसंख्या सारखी असताना संगमनेर तालुक्यासाठी ४७२ इंजेक्शन देण्यात आले. अकोले तालुक्यासाठी केवळ १० इंजेक्शन देण्यात आली आहेत. जीवनावश्यक औषधांचे वितारणामध्ये हा भेदभाव अत्यंत संतापजनक आहेत अकोले तालुक्यात कमी दिलेले रेमेडीसिवीर इंजेक्शन अपुरे आहेत यात तातडीने सुधारणा व्हावी.
  • कोरोनाचा संसर्ग पाहता तालुक्यात कोव्हीड केअर सेंटर व कोव्हीड हॉस्पिटल, ऑक्सिजन बेडस, वैद्यकीय प्रशिक्षित मनुष्यबळ, औषध व वैद्यकीय साधने यांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा व विस्तार करावा.
  • कोव्हीड रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करण्यामध्ये महत्वाची भूमिका करणाऱ्या आशा कर्मचारी, अर्धवेळ परिचर व इतर तत्सम कर्मचाऱ्यांना अतिरिक्त प्रोत्साहन व भत्ता देण्यात यावा.
  • कोरोना निदानासाठी आवश्यक असणाऱ्या अॅटीजेन किट्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत. तसेच RTPCR च्या तपासण्या पुरेशा प्रमाणात घेऊन त्याचे निकाल रुग्णांना लवकरात लवकर कळतील याची व्यवस्था करावी.
  • तालुक्यामध्ये पूर्ण क्षमतेने लसीकरणाची मोहीम राबविण्यात येऊन जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यात यावे.

वरील सर्व सोयी सुविधा तातडीने राबविण्यात यावे असे आवाहन करण्यात आले.  

Web Title: For Corona Services agitation in front of Akole tehsil

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here