Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात तीन हजार पार कोरोनाबाधित तर संगमनेर १८४, वाचा तालुकानिहाय संख्या

अहमदनगर जिल्ह्यात तीन हजार पार कोरोनाबाधित तर संगमनेर १८४, वाचा तालुकानिहाय संख्या

Ahmednagar Corona Report Today 3280

अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात तीन हजाराहून अधिक रुग्णसंख्या बाधित आढळून आली आहे. संगमनेर तालुक्यात १८४ बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३ हजार २८० जणांना करोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे.

नगर शहरात सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून आली आहे. नगर शहरात तब्बल ८८७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. नगर तालुका व राहता तालुका बाधित रुग्णसंखेत आघाडीवर आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार, नगर शहर ८८७, पारनेर १०१, कर्जत २३६, कोपरगाव १५२, अकोले १३७, पाथर्डी ९८, नगर तालुका ३४१, नेवासे ९५, श्रीरामपूर १८९, संगमनेर १८४, राहता २८०, श्रीगोंदे ४६, जामखेड ४८, शेवगाव १६४, भिंगार शहर ६८, राहुरी १८६, इतर जिल्हा ५५, मिलिटरी हॉस्पिटल १३ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्यात कोरोनाने भयंकर रूप धारण केले असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे.  

Web Title: Ahmednagar Corona Report Today 3280

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here