Home अहमदनगर विद्यालयातील कर्मचाऱ्याने अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी सक्तमजुरी

विद्यालयातील कर्मचाऱ्याने अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी सक्तमजुरी

Ahmednagar Crime: शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीचा तेथील कर्मचाऱ्याने लैगिंक छळ (sexual harassment) केल्याप्रकरणी न्यायालयाने त्याला पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा.

Forced labor in case of sexual harassment of a minor girl by a school employee

अहमदनगर:  एका नामांकित विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीचा तेथील कर्मचाऱ्याने लैगिंक छळ केल्याप्रकरणी न्यायालयाने त्याला पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. आत्माराम बापुराव लगड (वय ५८, रा. आठवड ता. नगर) असे दोषी कर्मचाऱ्याचे नाव आहे.

जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. ए. बरालीया यांनी हा निकाल दिला. या खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी वकील अॅड. सी. डी. कुलकर्णी यांनी पाहिले. घटनेतील अल्पवयीन मुलगी ही नगर येथील एका नामांकित विद्यालयामध्ये सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होती. २ डिसेंबर २०१९ रोजी व ४ डिसेंबर २०१९ रोजी शाळेत तेथील कर्मचारी लगड याने तिचा लैगिंक छळ केला.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलिस निरीक्षक डी. एस. मुंडे यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाने एकूण सात साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या. खटल्यात पैरवी अधिकारी पोलिस हवालदार के. एन. पारखे यांनी सहकार्य केले.

Web Title: Forced labor in case of sexual harassment of a minor girl by a school employee

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here