Ahmednagar | Shevgaon News: मुंगी येथील घटना, गावातील व्यक्तीचेच कृत्य.
शेवगाव | अहमदनगर: पाण्याच्या अनधिकृत नळ कनेक्शनबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या तालुक्यातील मुंगी येथील सरपंचावर एकाने कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात सरपंच बबन ऊर्फ दादासाहेब भुसारी हे गंभीर जखमी नव्हता. झाले असून, त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंगी गावात राहणाऱ्या एका व्यक्तीची पाणीपट्टी थकली होती. त्यामुळे त्याने दुसरे अनधिकृत नळ कनेक्शन घेतले. याबाबत सरपंच भुसारी हे त्याला मंगळवारी सायंकाळी विचारणा करण्यासाठी गेले असता, या व्यक्तीने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. त्यानंतर, जखमी भुसारी यांना ग्रामस्थांनी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, भुसारी यांचा जबाब नोंदविण्यासाठी पोलीस रुग्णालयात गेले. मात्र, ते जबाब देण्याच्या अवस्थेत नव्हते. त्यामुळे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला
विशेष म्हणजे, हल्यात गंभीर जखमी झालेले सरपंच भुसारी यांच्याविरोधात मुंगी येथील प्रदीप पंढरीनाथ गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेवगाव पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. या तक्रारीत भुसारी यांच्यासह अशोक बोबले, गोरक्ष गव्हाणे, सुभाष भुसारी यांच्याही नावाचा समावेश आहे.
Web Title: Sarpanch assaulted by a coyote