संगमनेरात शिवसैनिकांनी खा. सदाशिव लोखंडे यांच्या फोटोला फासले काळे
Sadashiv Lokhande: लोखंडे यांना आम्ही शिवसैनिक कुठल्याही परिस्थितीत संगमनेर तालुक्यात फिरू देणार नाही.
संगमनेर : खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली. ते शिंदे गटाला आणि भाजपला जाऊन मिळाले. लोखंडे यांना आम्ही शिवसैनिक कुठल्याही परिस्थितीत संगमनेर तालुक्यात फिरू देणार नाही. असा इशारा शिवसेनेचे संगमनेर शहर प्रमुख अमर कतारी यांनी दिला. मंगळवारी (दि. १९) शिवसेनेच्या संगमनेर शहर कार्यालयाबाहेर असलेल्या खासदार लोखंडे यांच्या फोटोला शिवसैनिकांनी काळे फासले.
शिवसेनेचे नागपूरचे संपर्क प्रमुख नरेश माळवे, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष मुजीब शेख, उपजिल्हा प्रमुख भाऊसाहेब हासे, उपशहर प्रमुख विकास डमाळे, दीपक वन्नम, इम्तियाज शेख, गोपाल लाहोटी, शाखाप्रमुख अजीज मोमीन, महिला सचिन साळवे, विजय भागवत आदी उपस्थित होते.
खासदार सदाशिव लोखंडे यांना शिवसैनिकांनी आणि सर्वसामान्यांनी निवडून दिले. मात्र, त्यांचे पक्षासाठी योगदान नाही. आजवर त्यांची प्रतिमा मिस्टर इंडिया अशीच आहे. त्यांना मतदारसंघातील प्रश्नच समजलेले नाहीत. शिवसैनिकांच्या सुख-दुःखात त्यांचा कधी सहभाग नव्हता. फितूर गटाला ते सामील झाले. शिवसेनेत गद्दारीला अजिबात थारा नाही, गद्दार हे तुडवलेच जातील. असा इशारा सेनेचे नागपूरचे संपर्क प्रमुख नरेश माळवे यांनी दिला.
Web Title: Shiv Sainiks ate at Sangamaner Sadashiv Lokhande’s photo is black