Home अकोले अकोले:  माजी उपसरपंचाला बेदम मारहाण

अकोले:  माजी उपसरपंचाला बेदम मारहाण

Breaking News | Akole: गावातील चौघांनी कोयता, गज, काठ्यांनी दुकानात घुसून जोरदार मारहाण, राजूर पोलिसांनी चारही आरोपींना घेतले ताब्यात.

Former deputy sarpanch was brutally beaten

राजूर: अकोले तालुक्यातील बांगरवाडी येथील माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य सुरेश भांगरे यांना त्याच गावातील चौघांनी कोयता, गज, काठ्यांनी दुकानात घुसून जोरदार मारहाण केल्याने ते जबर जखमी झाले. मात्र त्यांच्या तावडीतून सुटून जखमी अवस्थेत ते जंगलात पळाले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

त्यांना राजूर पोलिसांनी तातडीने राजूर ग्रामीण रुग्णालयात हलवून औषधोपचार केले व त्यांची फिर्याद दाखल करून आरोपींना ताब्यात घेतले आहे. याबाबतचे वृत्त असे की, पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून माजी उपसरपंच सुरेश भिवाजी भांगरे (वय ५५) यांना हिलेदेव फाट्यावर असलेल्या त्यांच्या दुकानात घुसून २५ मार्च रोजी सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास राजेंद्र हिंदुराज धादवड, अशोक हिंदुराज धादवड, ज्ञानेश्वर शंकर धादवड व विठ्ठल भाऊराव धादवड (सर्व रा. बांगरवाडी, कौठवाडी) यांनी गज, कोयता, काठ्यांनी जोरदार मारहाण केली. त्यात कोयता लागल्याने सुरेश भांगरे यांच्या डोक्याला जबर मार लागला, त्यांच्या हातातील हत्याराने पाठीवर व डोक्याला मार लागला तरी जीव मुठीत धरून सुरेश भांगरे जंगलात पळाले.

त्यामुळे पुढील अनर्थ टळला. याबाबत भांगरे यांनी राजूर पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांनी भादंवि कलम ४५२, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ४२७, ३४, ४, २५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Web Title: Former deputy sarpanch was brutally beaten

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here