Home महाराष्ट्र पाटीलच्या लावणी कार्यक्रम परिसरात मृतदेह आढळल्याने खळबळ, तरुणांच्या हुल्लडबाजीने शाळेचे मोठे नुकसान

पाटीलच्या लावणी कार्यक्रम परिसरात मृतदेह आढळल्याने खळबळ, तरुणांच्या हुल्लडबाजीने शाळेचे मोठे नुकसान

Sangli Found Dead Body: लावणी कार्यक्रम परिसरात मृतदेह आढळून आल्याने खळबळ, मोठी गर्दी, हुल्लडबाजीमुळे जिल्हा परिषद शाळेचे मोठे नुकसान.

Found of dead body in the planting area

सांगली : सोशल मीडिया स्टार आणि लावणी डान्सर गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात अश्लील डान्स केल्यामुळे गौतमी चर्चेत आली होती. आता सांगली जिल्ह्यातील बेडग येथे तिच्या कार्यक्रमात मोठी गर्दी जमली होती. त्या ठिकाणी एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

बेडग येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. लावणी कार्यक्रमात मोठी गर्दी जमली होती. यावेळी काही प्रेक्षकांकडून जिल्हा परिषद शाळेच्या छतावर चढून कार्यक्रम पाहताना शाळेच्या कौलारू छताचा चुराडा झाला. प्रेक्षकांनी हुल्लडबाजी केली आणि शाळेची कौले फुटली.

तार जाळीच्या कंपाऊंडचेही नुकसान झाले, त्याच बरोबर ज्या झाडावर प्रेक्षक बसले होते. ती काही झाडांचेही नुकसान झाले आहे. शाळेच्या झालेल्या नुकसानीस कोण जबाबदार? असा सवाल आता ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. या कार्यक्रमात चक्क शिक्षकही नाचत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

कार्यक्रम परिसराच्या बाहेर एक मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला. दत्तात्रय विलास ओमासे असे मृताचे नाव आहे. ओमासे हे गर्दीत खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र ओमासे यांच्या मृत्यूबाबत मीरज ग्रामीण पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Found of dead body in the planting area

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here