Home पुणे Bus Fire: ब्रेकिंग: शिवशाही बसला भीषण आग

Bus Fire: ब्रेकिंग: शिवशाही बसला भीषण आग

Bus Fire: शास्त्रीनगर चौकात एका शिवशाही बसला आग लागल्याची घटना.

fire broke out in Shivshahi Bus

पुणे: पुण्यात आज(मंगळवार) सकाळी हॉटेलला आग लागली होती यातच आणखी एक आगीची घटना घडली आहे. शहरातील शास्त्रीनगर चौकात एका शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले होते. भर ररस्त्यात ही बस पेटल्याने एकच खळबळ उडाली होती आणि रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती.

या आगीत बसचा समोरील भाग पूर्णपणे जळून खाक झाला आहे. पुण्यातील अत्यंत रहदारीचा असा हा शास्त्रीनगर परिसर आहे आणि याच परिसरातील रस्त्यावर शिवशाही बसला आग लागली. शिवशाही बस क्रमांक एम एच ०६ डी डब्ल्यू ०३१७  यवतमाळ-औरंगाबाद-पुणे असा प्रवास करत होती. आज सकाळी येरवाड्यातील शास्त्रीनगर येथील गलांडे हॉस्पिटल जवळ ही बस आली असता तिने अचानक पेट घेतला. शिवाजीनगर बस डेपोकडे ही बस जात असताना ही दुर्घटना घडली. तर प्राप्त माहितीनुसार यवतामाळहून निघाल्यापासून ही बस वारंवार गरम होत होती. मात्र तशा अवस्थेत ती पुण्याला आली. सुदैवाने सर्व प्रवासी खराडी येथे उतरले होते.

Web Title: fire broke out in Shivshahi Bus

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here