Home Accident News देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या कारला अपघात, उद्योजकाचा मृत्यू

देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या कारला अपघात, उद्योजकाचा मृत्यू

Ahmednagar Accident: हुबळीजवळील घटना: तिघा जखमींवर रुग्णालयात उपचार.

Devotee's car accident, entrepreneur dies

अहमदनगर: तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन नगरकडे परत येत असताना कर्नाटकातील हुबळीजवळ झालेल्या अपघातात नागापूर येथील युवा विठ्ठल सप्रे उद्योजकाचा मृत्यू झाला तर अन्य तिघे जखमी झाले. यातील जखमींवर हुबळी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी (दि. ३०) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

विठ्ठल भानुदास सप्रे (वय ३४, रा. नागापूर) असे मयत युवा उद्योजकाचे नाव आहे. त्यांच्यासमवेत कारमध्ये असलेले सुदाम कातोरे, गणेश टिमकरे, धर्मेंद्र राय हे तिघेही जखमी झाले असून, त्यांच्यावर हुबळी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत विठ्ठल सप्रे यांच्या मृतदेहाची हुबळी येथेच उत्तरीय तपासणी करण्यात आली असून, सोमवारी (दि. ३१) दुपारी त्यांचा मृतदेह नगरकडे रुग्णवाहिकेतून रवाना करण्यात आला.

नगर शहर परिसरातील ९ जण २ कारद्वारे बुधवारी (दि. २६) भाऊबीजेच्या दिवशी नगरहून तिरुपती बालाजीला दर्शनासाठी गेले होते. तेथे दर्शन घेऊन ते नगरकडे येण्यास निघाले होते. रविवारी (दि. ३०) रात्री कोल्हापूर येथे मुक्काम करून सकाळी देवीचे दर्शन घेऊन ते नगरला निघणार होते. कर्नाटक राज्यातून कोल्हापूरकडे असा परिवार आहे.

येत असताना सायंकाळी ७ च्या सुमारास हुबळी शहराजवळ भरधाव कंटेनरने सप्रे यांच्या कारला धडक दिली. यात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

कारमधील उद्योजक विठ्ठल सप्रे यांचा मृत्यू झाला तर अन्य तिघे जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने हुबळीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच नागापूर परिसरातून ५ ते ६ वाहनांमधून अनेकजण अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी रवाना झाले. मयत सप्रे यांच्या मृतदेहाची हुबळी येथे सोमवारी (दि. ३१) सकाळी उत्तरीय तपासणी करण्यात आल्यानंतर दुपारी त्यांचा मृतदेह नगरकडे रवाना करण्यात आला. सप्रे हे नगर एमआयडीसीतील उद्योजक होते. ते एक्साईड कंपनीचे व्हेंडर होते.

Web Title: Devotee’s car accident, entrepreneur dies

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here