Home अहमदनगर अहमदनगर: पीक पंचनाम्यासाठी पैसे मागणारे तिघे निलंबित

अहमदनगर: पीक पंचनाम्यासाठी पैसे मागणारे तिघे निलंबित

Ahmednagar Suspended: नेवासा तालुक्यातील प्रकार, तिघे तडकाफडकी निलंबित केले.

Three suspended for demanding money for Peak Panchnama

नेवासा (जि. अहमदनगर) : चिलेखनवाडी (ता. नेवासा) येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून एकरी चारशे रुपयांची मागणी होत असल्याचा व्हिडिओ रविवारी व्हायरल झाला होता. शेतकरी, विविध संघटना आक्रमक झाल्यानंतर सोमवारी कृषी सहायक रोहिणी मोरे, चिलेखनवाडीच्या ग्रामसेविका कविता शिंदे, ग्रामपंचायत कर्मचारी संजय इंगळे यांचे आहे.

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नेवासा तालुक्यात कृषी सहायक, ग्रामसेवक व तलाठी यांना संयुक्त पाहणी करून  नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिले आहेत. दरम्यान, चिलेखनवाडी ग्रामपंचायत कर्मचारी संजय देवराम इंगळे व इतर दोघांनी चिलेखनवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पंचनाम्यासाठी पैशांची मागणी केल्याचा व्हिडिओ व्हायरल’ झाला आहे. या संदर्भात शिंदे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख संजय पवार, शंकर रिंधे यांनी तहसीलदार, कृषी विभागाकडे लेखी तक्रार केली होती.

त्यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आले. तसेच ऑनलाइन पैसे ट्रान्सफर केल्याबाबतचा पुरावा मिळाल्याने ग्रामपंचायत कर्मचारी संजय देवराम इंगळे यांचे सरपंचांनी निलंबन केले. ग्रामसेविका कविता भास्कर शिंदे यांचे निलंबन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केल्याची माहिती गटविकास अधिकारी संजय दिघे यांनी दिली.

त्याचप्रमाणे कृषी सहायक रोहिणी सुभाष मोरे यांच्या निलंबनाचा आदेश विभागीय कृषी सहसंचालक यांनी काढल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे यांनी दिली.

काय आहे प्रकरण?

■ पिकांचे पंचनामे करण्यासाठी शासनाचे अधिकृत अधिकारी शेतात न जाता गावातील खासगी लोकांची नेमणूक करून शेतकऱ्यांकडे पंचनाम्यासाठी पाठवीत आहेत.

  • हे लोक शेतकऱ्यांकडे पंचनामा करण्यासाठी एकरी २०० ते ४०० रुपयांची रोख स्वरूपात किंवा ऑनलाइन स्वरूपात मागणी करत आहेत. त्याशिवाय पंचनामे करत नाहीत.

■ त्या संबंधित पैसे मागणाच्या व्यक्तींचा शेतकऱ्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला. तो रविवारी तालुक्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

Web Title: Three suspended for demanding money for Peak Panchnama

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here