Home अहमदनगर अहमदनगर: तलवार हातात घेऊन दहशत करणाऱ्या चौघांना अटक

अहमदनगर: तलवार हातात घेऊन दहशत करणाऱ्या चौघांना अटक

Ahmednagar Crime:  तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकास तलवार हातात घेऊन फिरून दहशत निर्माण करणाऱ्या व शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तिघांना अशा चौघांना अटक (Arrested).

Four arrested for terrorizing with a sword

श्रीरामपूर: शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तिघांना व तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकास तलवार हातात घेऊन फिरून दहशत निर्माण करणाऱ्या अशा ४ आरोपींना पोलिसांनी तलवारीसह अटक केली आहे.

येथील दत्तनगर परिसरात रविवारी रात्री ७.३० वाजता प्रवरा कॅनॉलच्या पुलाच्या रस्त्यावर श्याम मधुकर कांबळे (रा. दत्तनगर) हा धारदार तलवार घेऊन मोठमोठ्याने ओरडत होता. त्यास पोलिसांनी रंगेहाथ तलवारीसह जेरबंद केले.

दुसऱ्या घटनेत श्रीरामपूर रेल्वे स्थानक परिसरात रात्री १ वाजता इरफान मयुद्दीन सय्यद (रा. वॉर्ड नं. १) यास धारदार तलवार जवळ बाळगून दहशत निर्माण करताना पोलिसांनी पकडले. तिसऱ्या घटनेत गोंधवणी परिसरात वॉर्ड नं. १, गोंधवणी रस्त्यावर सैफअली सनी शेख यास ११.१५ वाजण्याच्या सुमारास तलवार हातात घेऊन आरडाओरडा करतांना पोलिसांनी पकडले. चौथी घटना राहाता तालुक्यातील चितळी स्टेशन परिसरातील असून तेथे रात्री १२.३० च्या सुमारास बारकू सुदाम अंभोरे (रा. चितळी स्टेशन) याला तलवारीसह रात्रीची गस्त घालणाऱ्या  तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने पकडले.

Web Title: Four arrested for terrorizing with a sword

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here