Home अहमदनगर सुकेवाडी, पावाबाकी रोडवर दरोडा टाकणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद

सुकेवाडी, पावाबाकी रोडवर दरोडा टाकणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद

Ahmednagar, Sangamner: पावबाकी, सुकेवाडी येथील घरात प्रवेश करून, चाकुचा धाक दाखवुन दरोडा टाकणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला  यश.

Two inn criminals Arrested for robbery on Sukewadi, Pavabaki

अहमदनगर:  येथील कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील कल्याण रोड तसेच संगमनेर तालुक्यातील पावबाकी, सुकेवाडी येथील घरात प्रवेश करून, चाकुचा धाक दाखवुन दरोडा  टाकणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला  यश आले.

रावन ऊर्फ छनक नादर चव्हाण (वय 23) व फिलीप नादर चव्हाण (वय 23, दोघे रा. सालेवडगाव रोड, चिचोंडी पाटील, ता. नगर) अशी जेरबंद केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

कल्याण रोडवरील यश उमेश शेळके (वय 22) यांच्यासह त्यांच्या शेजारी राहणारे तीन साक्षीदार यांच्या घरी सहा ते सात दरोडेखोरांनी  चाकुचा धाक दाखवुन चार लाख 30 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरची घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला  यांनी घटना ठिकाणी भेट देवुन, निरीक्षण करून पोलीस निरीक्षक अनिल कटके  यांना स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करून दरोडेखोरांना अटक करण्याचे आदेश दिले होते.

नमुद आदेशान्वये निरीक्षक कटके यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, अंमलदार मनोहर शेजवळ, सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, बापुसाहेब फोलाणे, दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, फकिर शेख, देवेंद्र शेलार, विश्वास बेरड, शंकर चौधरी, विशाल दळवी, संदीप दरदंले, सचिन आडबल, भिमराज खर्से, दीपक शिंदे, जालिंदर माने, विनोद मासाळकर, आकाश काळे, रणजीत जाधव, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, सारीका दरेकर, बबन बेरड, संभाजी कोतकर, अर्जुन बडे व भरत बुधवंत अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथकाची नेमणुक केली होती.

सदरचे गुन्हे प्रशांत ऊर्फ धोळ्या चव्हाण (रा. सालेवडगाव रोड, चिचोंडी पाटील) याने त्याचे पाच ते सहा साथीदारासह केला असुन ते सर्व चिचोंडी पाटील शिवारातील सालेवडगाव रोडवरील माळरानावर लपुन बसलेले आहे, अशी माहिती निरीक्षक कटके यांना मिळाली होती. त्यांनी पथकास कळवुन खात्री करून कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वेशांतर करून सालेवडगाव येथे जावुन माळरानाची पहाणी करता त्यांना सहा ते सात इसम एका लिंबाचे झाडा खाली बसलेले दिसले. त्यांना पोलीस पथकाची चाहुल लागताच ते माळरानावर पळु लागले.

पथकाने लागलीच पाठलाग करून दोन संशयीतांना ताब्यात घेतले व त्यांचे इतर साथीदार डोंगरातील झाडा झुडपांचा सहारा घेवुन पळुन गेले. ताब्यात घेतलेल्या रावन ऊर्फ छनक नादर चव्हण, फिलीप नादर चव्हाण यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना अटक केली आहे. आरोपींनी पावबाकी, सुकेवाडी येथे घरात प्रवेश करून चाकुचा धाक दाखवुन चोरी केल्याची कबुली दिल्याने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल दरोडा, चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. दोघे आरोपी सराईत गुन्हेगारा असून त्यांच्याविरोधात संगमनेर शहर, नगर तालुका, कोतवाली, अंभोरा (जि. बीड) पोलीस ठाण्यात दरोडा, घरफोडी आदी कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Two inn criminals Arrested for robbery on Sukewadi, Pavabaki

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here