Home क्राईम धक्कादायक घटनेनं नाशिक हादरलं! घरात एकटीच होती महिला; अचानक दीर आला अन्..,

धक्कादायक घटनेनं नाशिक हादरलं! घरात एकटीच होती महिला; अचानक दीर आला अन्..,

Nashik Murder Case : घरात कुणी नसल्याचं पाहून चंदर याने यशोदाच्या डोक्यावर, मानेवर मागील बाजूस कुऱ्हाडीचे सपासप चार वार, घाव घालत निघृण खून केल्याची घटना.

Four blows with an ax, wounding and murder

नाशिक: अंगावर काटा आणणारी ही घटना नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा तालुक्यातील बिवळ गावात घडली. घरात वहिनीला एकटं स्वयंपाक करताना पाहून दीराची नियत फिरली. आजूबाजूला कुणी नसल्याची पाहून त्याने जवळ असलेली कुऱ्हाड उचलली. काही कळण्याच्या आतच त्याने वहिनीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. या घटनेत वहिनीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर आरोपी दीर हा फरार झाला आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी दीराचा शोध सुरू आहे. यशोदा लक्ष्मण गावंडे (वय २६) असं मृत्युमुखी पडलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. यशोदाला दोन महिन्याचे अपत्य आहे. तर चंदर गावंडे असं फरार झालेल्या संशयित दीराचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  सोमवारी रात्रीच्या सुमारास यशोदा ही घरात एकटीच होती. ती स्वयंपाक करत असताना अचानक तिचा चुलत दीर चंदर गावंडे हा घरी आला. घरात कुणी नसल्याचं पाहून चंदर याने यशोदाच्या डोक्यावर, मानेवर मागील बाजूस कुऱ्हाडीचे सपासप चार वार, घाव घालत निघृण खून केली. चुलीजवळ रक्ताचा सडा पडला होता.

कुऱ्हाडीचे वर्मी घाव इतके खोलवर होते की, मेंदूला रक्त पुरवठा करणा-या रक्तवाहिन्या पुर्णपणे तुटल्याने रक्त शरीरातून निघून गेल्याने जागेवरच मृत्यू झाला होता. ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता आरोपीच्या चपला, गुन्ह्यात वापरलेली कु-हाड ताब्यात घेत पंचनामा केला आहे. मात्र खूनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही संशयित आरोपी फरार झाला असून पोलीस निरीक्षक संदीप कोळी कसून तपास करीत आहेत.

Web Title: Four blows with an ax, wounding and murder

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here