Home क्राईम मित्रांसोबत शारिरीक संबंध ठेव नाहीतर… वेश्याव्यवसाय करुन घेण्याचा प्रयत्न

मित्रांसोबत शारिरीक संबंध ठेव नाहीतर… वेश्याव्यवसाय करुन घेण्याचा प्रयत्न

Pune Crime News: मैत्रिणीकडून वेश्याव्यवसाय (prostitution) करुन घेण्याचा प्रयत्न, आरोपी महिलेसह तिघांविरोधात विनयभंगाचा (Molested) गुन्हा दाखल.

try to engage in prostitution

पुणे : पुण्यातील धनकवाडी परिसरात मैत्रीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेनेच आपल्याच मैत्रिणीकडून वेश्याव्यवसाय करुन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने नकार दिल्यानंतर मित्रांच्या सोबत मिळून तिला मारहाण करण्यात आली. यानंतर महिलेच्या दोघा मित्रांनी पीडितेचा विनयभंग केला. महिलेने कशी बशी स्वतःची सुटका करुन घेत सहकारनगर पोलीस ठाणे गाठले आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी महिलेसह तिघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, बालाजी नगर धनकवडी येथे राहणाऱ्या एका महिलेने रात्री 10 वाजता आपल्या एका मैत्रिणीला घरी बोलावले. मैत्रिण घरी गेली तेव्हा तेथे दोन जण आधीच तिथे उपस्थित होते. आरोपी महिला तिच्या मैत्रिणीला म्हणाली, ‘तुला माझ्या दोन्ही मित्रांना आवडली आहे. त्यांच्याशी सेक्स करा. मी तुला त्यांच्याकडून 5 हजार रुपये मिळवून देते.’ एवढेच नाही तर नकार दिल्यास तिला चोरीच्या आरोपात अडकवण्याची धमकीही दिली. तक्रारदार महिला केअर टेकरचे काम करते आणि आरोपी महिला तिची मैत्रिण आहे.

शारीरिक संबंध ठेवण्याची ऑफर नाकारल्यामुळे आरोपी महिलेने तिच्या पुरुष मित्रांसह तिला मारहाण केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने त्यांचे म्हणणे ऐकले नाही. जेव्हा महिलेने सेक्सचा प्रस्ताव नाकारला आणि तिथून निघण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपी महिलेने तिच्या दोन पुरुष मित्रांसह तिच्यावर चोरीचा (Theft) आरोप केला.

दरम्यान, दोन्ही पुरुष आरोपींनी मिळून तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या पीडितेने कशीतरी सुटका करून घेतली आणि तेथून बाहेर पडल्यानंतर तिने थेट सहकार नगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी महिलेसह तिघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा (Crime) दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: physical relations with friends or else… try to engage in prostitution

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here