Home संगमनेर संगमनेर: दुचाकी कारवर आदळल्याने अपघात, चौघे जखमी

संगमनेर: दुचाकी कारवर आदळल्याने अपघात, चौघे जखमी

Sangamner Accident News:  एकाच दुचाकीवरून चौघे जात असताना अपघात, चार कामगार जखमी.

Four injured in two-wheeler collision with car Accident

संगमनेर: एकाच दुचाकीवरून चौघे कामगार जात असताना दुचाकी चालकाचे आपल्या गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही दुचाकी समोरून येणाऱ्या कारवर जावून आदळली. त्यामुळे या अपघातात चौघे कामगार जखमी झाले असून कारचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. हा अपघात आज बुधवारी सकाळी नाशिक – पुणे महामार्गावरील राजापूर पुलाजवळ घडला.

या अपघाताची माहिती अशी की, डिझायर कार क्र. एम. एच. १७ बी. २८१४ ही संगमनेर वरून राजाकडे जा होती. दरम्यान नाशिक-पुणे महामार्गावरील राजापूर पुलाखालून ही कार येत असतांना उत्तरेकडून सर्विस रोडने आलेली दुचाकी (क्र. एम. एच. १७ ए. पी. ४९५४) भरधाव वेगाने कारवर आदळली. ही धडक एवढी भयानक होती की दुचाकीवरून एकजण उडून कारच्या समोरील काचेवर जाऊन आदळला. तर तिघे रस्त्यावर आदळले. त्यामुळे चौघेही जखमी झाले. या जखमीत बिपीन भोला, धर्मेंद्र, सुरेंद्र व खन्ना असे चौघे कामगार जखमी झाले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Web Title: Four injured in two-wheeler collision with car Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here