Home अकोला Rape Case | रिपाई आठवले गटाच्या जिल्हाध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा

Rape Case | रिपाई आठवले गटाच्या जिल्हाध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा

Akola Rape Case:  ३५ वर्षीय महिलेने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.

Rape case against district president of Ripai Athawale group

अकोला: रिपाईचे अकोला जिल्हाध्यक्षावर गजानन कांबळे यांच्यावर अकोला शहरातील रामदास पेठ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

लग्नाचं आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला असल्याचा आरोप एका ३५ वर्षीय महिलेनं केला होता. पीडित महिलेच्या आरोपानंतर कांबळे यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोल्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अकोला महानगराध्यक्ष गजानन काशिनाथ कांबळे (वय ४५) यांच्यावर एका ३५ वर्षीय महिलेने लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे.

लग्नाचं आमिष दाखवून अनेकदा विविध हॉटेलवर नेत बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच सदर प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच मारहाणही केल्याचा आरोप करण्यात आला.

याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार रामदास पेठ पोलीस ठाण्यात गजानन कांबळे यांच्यावर ३७६ (२) (N), ३२३, ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गजानन कांबळे आणि तक्रारदार महिला यांच्यात गेल्या चार वर्षापासून ओळख असून पुढं त्यांचं प्रेमात रूपांतर झालं होतं अशी माहिती मिळत आहे.

याबाबत अधिक तपास रामदास पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजीवनी पुंडगे करीत आहेत.

Web Title: Rape case against district president of Ripai Athawale group

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here