Home नाशिक तिहेरी अपघातात चौघांचा मृत्यू, संगमनेरची विद्यार्थिनी मृत

तिहेरी अपघातात चौघांचा मृत्यू, संगमनेरची विद्यार्थिनी मृत

Breaking News | Nashik Accident: पिकअप-दुचाकी व कारमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू (Death).

Four killed in triple accident, Sangamner student dead

इगतपुरी : तालुक्यातील घोटी-सिन्नर महामार्गावरील उंबरकोन फाट्याजवळ पिकअप-दुचाकी व कारमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू, तर तीनजण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. ८) दुपारी घडली.

पिकअपचालक कारला च्ये ओव्हरटेक करत असताना झालेल्या गोंधळात हा अपघात घडला. कार रस्त्यावर आडवी झाली. त्याचवेळी समोरून भरधाव येणारी ट्रिपलसीट दुचाकी आदळली. दुचाकीवरील हृषीकेश तुळशीराम आगिवले (वय २२), टिलू सोमनाथ आगिवले (२४), पिंटू राजेंद्र आगिवले (२१, सर्व रा. भावली खुर्द, ता. इगतपुरी) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. कारमध्ये असलेली एसएमबीटी येथे शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी वैष्णवी काशीद संगमनेर) (रा. देखील गतप्राण झाली.

इगतपुरी तालुक्यातील घोटी- सिन्नर महामार्गावरील उंबरकोन फाट्याजवळ शुक्रवारी दुपारी झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. मोटारसायकल आणि चारचाकी वाहन यांच्यात हा अपघात झाला घोटी-सिन्नर रस्त्यावरील उंबरकोन फाट्याजवळ एका मालवाहू वाहनाने चारचाकी वाहनाला हूल दिल्याने वाहन जागीच रस्त्यावर आडवे झाले. त्याचवेळी भरधाव येणारी मोटार सायकल चारचाकीला आदळल्याने मोटारसायकलवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात गंभीर जखमी मेघा शिंदे, साहिल शिंदे, भूमिका वावरे यांना घोटी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णवाहिका चालक मुजफर रंगरेज, नंदु जाधव यांनी धाव घेऊन जखमींना तातडीने घोटी येथील रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

Web Title: Four killed in triple accident, Sangamner student dead

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here