Home अहमदनगर कोकणगाव शिवारात चार मोर मृतावस्थेत आढळले

कोकणगाव शिवारात चार मोर मृतावस्थेत आढळले

Four peacocks die in Kokangaon Shivara Shrigonda

श्रीगोंदा | Shrigonda: श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव शिवारात उल्हास दिनकर शिंदे यांच्या शेतात चार मोर मृत अवस्थेत आढळून आले आहेत. बर्ड फ्लू च्या पार्श्वभूमीवर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कोळगाव, आढळगाव परिसरात मोरांची संख्या अधिक मोठ्या प्रमाणात आहे. सध्याच्या काळात अतिक्रमणे वाढले आहेत. झाडे झुडपे कमी झाली आहे. मोरांची वसाहत नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.अशाच परिस्थिती कोकणगाव शिवारात चार मोरांचा मृत्यू झाला आहे. या मोरांचा मृत्यू नेमकी पिकांवरील विषारी कीटकनाशक की शिकार्याच्या जाळ्यात अडकण्याच्या भीतीने की बर्ड फ्लू मुळे झाला याचा तपास घेणे अत्यावश्यक आहे. या घटनेने परिसरात नेमकी कशामुळे मृत्यू झाला या चर्चेस उधाण आले आहे.

Web Title: Four peacocks die in Kokangaon Shivara Shrigonda

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here