Home अहमदनगर श्रीरामपूर विधानसभेचे माजी आमदार यांचे निधन

श्रीरामपूर विधानसभेचे माजी आमदार यांचे निधन

Daulatrao Pawar Passed away

श्रीरामपूर: श्रीरामपूर विधानसभेचे माजी आमदार दौलतराव मल्हारराव पवार वय ८२ पुणतगाव ता. नेवासा यांचे बुधवारी दुपारी १.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

पवार हे १९८५ साली विधानसभेवर निवडून गेले. मुळा प्रवरा सहकारी वीज संस्थेचे ते अध्यक्ष होते. विचार जागर मंचचे ते अध्यक्ष होते. ते काही कालावधीत अशोक साखर कारखान्याचे उपाध्यक्ष होते. तसेच पाचेगाव येथील भारत सेवा संघ या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते.

माजी आमदार पवार यांच्यावर साखर कारखाना रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुभद्राबाई व सुधाकर, भागवत, अनिल व डॉ. शरद पवार असे चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

श्रीरामपूर शहरात वकील व्यावसाय ते करत असतना माजी खा. गोविंदराव आदिक यांच्या संपर्कात येऊन त्यांच्या नेतृत्वाखाली राजकीय व सामाजिक कार्यास सुरुवात त्यांनी केली.

Web Title: Daulatrao Pawar Passed away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here