Home संगमनेर संगमनेर तालुक्यातील घटना: विद्यार्थिनीची छेडछाड, दोघांवर गुन्हा दाखल

संगमनेर तालुक्यातील घटना: विद्यार्थिनीची छेडछाड, दोघांवर गुन्हा दाखल

Sangamner Taluka Student molestation both charged

संगमनेर | Sangamner: तालुक्यातील साकुर येथे जांबूत रोडने पायी जाणाऱ्या दोन विद्यार्थिनींचा दोन तरुणांनी पाठालाग करून त्यांची छेडछाड करून त्यांचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. सदर घटना मंगळवारी सकाळी घडली.

तसेच यावेळी आरोपीने पिडीत तरुणीच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी दोन तरुणांविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष शिवाजी बर्डे रा.मांडवे बुद्रुक संगमनेर व आदिक किसन कुदनर रा. शिंदोडी ता. संगमनेर असे या गुन्हा दाखल झालेल्यातरुणांची नावे आहेत.

याबाबत पिडीत तरुणीने घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून या फिर्यादीत म्हंटले आहे की, मी व माझी मैत्रीण घरी जाण्यासाठी जांबूत रोडने पायी जात होते. त्यावेळी आरोपी कुदनर व बर्डे हे दोघे एका गाडीवर आले असता त्यांनी शिट्टी वाजवत आमच्या भोवती गिरत्या मारण्यास सुरुवात केली. त्यावेळी आरोपी यांनी पिडीत मुलीस तू आमच्या सोबत चाल असे म्हणत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यांनतर पिडीत तरुणीने त्या दोघांना तेथून चालते व्हा असे सांगितले.

दरम्यान तरुणीचा भाऊ तेथे आला असता त्याने याप्रकरणी जाब विचारला असता त्यांनी उलट त्यालाच धक्काबुकी करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Web Title: Sangamner Taluka  Sakur Student molestation both charged

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here