Home अहमदनगर अहमदनगर: वीज अंगावर पडून चौघांचा मृत्यू, वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले

अहमदनगर: वीज अंगावर पडून चौघांचा मृत्यू, वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले

Ahmednagar News: जिल्ह्याच्या उत्तर भागात वादळी वारा आणि विजांचा कडकडाट झाला. त्यामध्ये नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यात वीज अंगावर पडून (lightning strike) चौघांचा मृत्यू झाल्याची घटना.

Four people died due to lightning strike, stormy winds, and rains

अहमदनगर: बुधवारी सायंकाळी जिल्ह्याच्या उत्तर भागात वादळी वारा आणि विजांचा कडकडाट झाला. त्यामध्ये नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यात वीज अंगावर पडून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

नेवासा तालक्यातील बालाजी देडगाव येथील शेतमजूर महिला सविता राजू बर्फे (वय ४२) व अंमळनेर येथील शेतकरी रावसाहेब भागाजी बोरूडे अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. बुधवारी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांची पळापळ सुरू झाली. त्याचवेळी बालाजी देडगाव येथे एका ठिकाणी कांदा काढणी सुरू होती. वादळी वारा सुरू झाल्याने कांदा काढणी करणाऱ्या महिला आडोशाला जात होत्या. त्याच वेळी सविता बर्फे यांच्या अंगावर वीज पडली. शेतामध्ये काम करीत असलेल्या रावसाहेब बोरूडे या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला. देडगाव येथील शेतकरी राहुल कडूबाल तांबे यांच्या घरासमोरील झाडावर वीज पडल्याने झाडाखाली बांधलेल्या गायीचा मृत्यू झाला. नेवासा तालुक्यातील पाचेगाव, कारवाडी, अंमळनेर प्रत्येकी एक तर देडगाव येथे २ ठिकाणी ठिकाणी वीज पडल्याच्या घटना बुधवारी सायंकाळी घडल्या.

श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर येथे बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान वीज पडून शेतात काम करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अन्य एक महिला जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये प्रमोद भाऊसाहेब दांगट व अलका रामा राऊत या दोघांचा समावेश आहे. श्रीरामपूर तालुक्याच्या प्रवरा नदीकाठ परिसरात अवकाळी पाऊस पडला. यावेळी प्रमोद दांगट यांच्या शेतात काही मजूर काम करत होते. अवकाळी पावसात अडकले गेले. त्यामुळे अंगावर वीज कोसळून भाऊसाहेब दांगट व अलका राऊत या दोघांचाही मृत्यू झाला. दांगट यांच्याच शेतात काम करणाऱ्या मंदा रवींद्र साळे या मजूर महिला वीज कोसळल्याने जखमी झाल्या. त्यांच्यावर श्रीरामपूर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Four people died due to lightning strike, stormy winds, and rains

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here