Ahmednagar News: महाविद्यालयात शिक्षण घेणार्या अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या( Suicide) केल्याची घटना, आत्महत्येनंतर धक्कादायक बाब आली समोर.
अहमदनगर: महाविद्यालयात शिक्षण घेणार्या अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दिनांक 23 एप्रिल) रात्री पांगरमल (ता. नगर) शिवारात घडली होती. स्नेहल महादेव आव्हाड (वय 16) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. तिच्या आत्महत्येनंतर धक्कादायक बाब समोर आली आहे. ती ज्या वाहनाने महाविद्यालयात जात होती, त्या वाहन चालकाच्या छेडछाडीला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले.
याप्रकरणी वाहन चालकाविरूध्द एमआयडीसी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण आव्हाड (रा. चिचोंडी, ता. पाथर्डी) असे त्याचे नाव आहे. मयत स्नेहल हिचे चुलते नामदेव नाना आव्हाड (रा. पांगरमल) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्नेहल पाथर्डी तालुक्यातील शिराळ चिचोंडी येथील महाविद्यालयात अकरावीत शिक्षण घेत होती. ती पांगरमल गावातून दररोज एका मारूती ओमनी गाडीने चिचोंडी येथे जात असे. या गाडीचा चालक असलेला प्रवीण आव्हाड हा गेल्या काही दिवसांपासून तिची वारंवार छेडछाड काढत असे. तसेच, तिला मोबाईलवर फोन करून, मेसेज करून, व्हॉटस्अॅप चॅटींग करून, तसेच व्हिडिओ कॉल करून त्रास देत असे. या त्रासाला कंटाळून तिने रविवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान राहत्या घरातील पत्र्याच्या पाईपला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत प्रारंभी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, नंतर तिच्या कुटुंबियांना तिला वाहनचालकाने दिलेल्या त्रासाबाबत माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी तिचा मोबाईल तपासला असता, त्यांना या गंभीर प्रकारची आणखी सखोल माहिती मिळाली. त्यानंतर मयत स्नेहल हिचे चुलते नामदेव आव्हाड यांच्या फिर्यादीवरून गाडीचा चालक प्रवीण आव्हाड विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चाहेर करीत आहेत.
Web Title: girl commits suicide after being harassed by a driver while going to college
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App