Home महाराष्ट्र सिन्नर शिर्डी बस अपघातात चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, सात मृतांची ओळख पटली

सिन्नर शिर्डी बस अपघातात चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, सात मृतांची ओळख पटली

Sinnar Shirdi Bus Accident Update:  बस आणि ट्रक अपघातात 10 जणांचा मृत्यू, चार वर्षीय मुलीचा मृत्यू, सात जणांची ओळख पटली, अद्याप तीन जणांची ओळख पटलेली नाही.

Four-year-old girl dies in Sinner Shirdi bus accident, seven dead identified

सिन्नर : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात ईशानेश्वर मंदिरानजीक आज (शुक्रवार) पहाटे झालेल्या आराम बस आणि ट्रक अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात (Accident) चार वर्षाच्या एका मुलीचा समावेश आहे. या अपघातात मृत्यूमुखी (Death) पडलेल्या सात जणांची ओळख पटली असून उर्वरित तीन जणांची अद्याप ओळख पटलेली नाही अशी माहिती प्रशासनाने दिली.

प्रशासनानकडून मिळालेल्या माहितीनूसार या ८ महिला आणि पुरुष तर २ मुलांचा मृत्यू झाला आहे. सुमारे वीस ते पंचवीस प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अपघातातील मृतांची नावे

प्रमिला प्रकाश गोंधळी (वय-४५, अंबरनाथ)

वैशाली नरेश उबाळे (वय ३२, अंबरनाथ)

श्रावणी सुहास बारस्कर (वय ३०, अंबरनाथ)

श्रध्दा सुहास बारस्कर (वय ४, अंबरनाथ)

नरेश मनोहर उबाळे (वय ३८, अंबरनाथ)

बालाजी कृष्णा मोहंती (वय-२५, ड्रायव्हर)

दिक्षा संतोष गोंधळी (वय १८, कल्याण)

उर्वरित तीन जणांची अद्याप ओळख पटलेली नाही.

एकूण प्रवाशी ४५

मृत्यू १०

ओळख पटलेले ०७

अनोळखी ०३

अपघातग्रस्तांवर पुढील रुग्णालयात उपचार सुरू

मातोश्री हॉस्पिटल ०३

डॉ. साळुंखे हॉस्पिटल ०१

यशवंत हॉस्पिटल १६

एकूण २० प्रवाशांवर उपचार सुरू असून सिन्नर रुग्णालयातून चार प्रवाशांना उपचारानंतर सोडण्यात आले आहे अशी माहिती प्रशासनाने दिली.

Web Title: Four-year-old girl dies in Sinner Shirdi bus accident, seven dead identified

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here