Home महाराष्ट्र हृदयद्रावक घटना:  घरासमोरील ट्रॅक्टर मुलांच्या अंगावर जात होता, आई वाचवायचा धावली अन्…

हृदयद्रावक घटना:  घरासमोरील ट्रॅक्टर मुलांच्या अंगावर जात होता, आई वाचवायचा धावली अन्…

Accidental Death:  मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात एका आईने आपला जीव गमावला. नांगराचा फाळ थेट तिच्या डोक्यात घुसला.

mother lost her life trying to save her children

सांगली | Sangli: शिराळा येथून एक दुर्दैवी घटना घडली आहे. आपल्या मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात एका आईने आपला जीव गमावला आहे. शिराळा येथील तडवळे येथे घरासमोर उभा केलेला ट्रॅक्टर उतारावरुन घसरुन रस्त्यावर खेळत असलेल्या दोन मुलांच्या अंगावर जात होता. मात्र, तेवढ्यात त्यांची आई त्यांना वाचवण्यासाठी धावून आली. मात्र, मुलांना वाचवण्यासाठी धावताना या आईचा पाय घसरला आणि ट्रक्टरला जोडलेला नांगराचा फाळ थेट तिच्या डोक्यात घुसला. त्यानंतर उपचारादरम्यान या आईचा मृत्यू झाला.

संचिता संपत पाटील (वय २८) असं या आईचं नाव आहे. तडवळे येथे पाटील कुटुंब राहतं. संपत पाटील यांनी त्यांच्या मालकीचा ट्रॅक्टर रोजप्रमाणे घरासमोर रस्त्याच्या कडेला उभा केला होता. दुपारच्या सुमारास संचिता या अंगणातील गोठा स्वच्छ करत होत्या आणि त्यांची दोन्ही मुलं कृषांत (वय २) आणि दुर्वा (वय ४) ही रस्त्यावर खेळत होती.

यादरम्यान, रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रॅक्टर अचानक सरकला आणि तो रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांच्या दिशेने जाऊ लागला. हे लक्षात येताच संचिता यांनी आरडाओरड केली आणि थेट त्या मुलांना वाचवण्यासाठी धावल्या. मात्र, यावेळी अचानक धावताना त्यांचा पाय घसरला आणि त्या ट्रॅक्टरच्या मागे जोडलेल्या नांगराच्या फाळावर जाऊन आदळल्या. यामध्ये नांगराचा फाळा त्यांच्या डोक्यात घुसला. त्यानंतर तो ट्रॅक्टर थांबला पण संचिता या गंभीर जखमी झाल्या. जेव्हा संचिता या आरडाओरड करत धावल्या तेव्हा त्यांचे शेजारी देखील धावले आणि त्यांनी मुलांना रस्त्यातून बाजूला केलं. त्यानंतर संचिता यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू (Death) झाला. या घटनने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: mother lost her life trying to save her children

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here