Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: विवाहित तरुणाचा अपघातात मृत्यू

अहमदनगर ब्रेकिंग: विवाहित तरुणाचा अपघातात मृत्यू

Ahmednagar Accident News: क्लूजर गाडी आणि दुचाकीत झालेल्या अपघातात विवाहित तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना.

Married youth dies in an accident

श्रीरामपूर | Shrirampur: श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर-खंडाळा रस्त्यावरील प्रभात डेअरी जवळ झालेल्या अपघातात येथील विवाहित तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सौरभ सुरेश ढोकचौळे (वय 27) अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  आज दुपारी सौरभ श्रीरामपूर येथून खंडाळाच्या दिशने आपल्या दुचाकीवर जात असतांना बाभळेश्वरकडून येणाऱ्या क्लूजर गाडीचा सौरभच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. या धडकेने सौरभ जागीच कोसळल्याने सौरभचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक लोकांनी सौरभला रुग्णालयात नेले असता डॉक्टरानी सौरभला मृत घोषित केले.

घटनेची माहिती पोलिसांकडून तात्काळ सौरभच्या घरी कळविण्यात आली. घटना घडताच गावांतील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. यापूर्वीही याच ठिकाणी शेकडो अपघात घडून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सौरभ प्रभात डेअरीच्या पाठीमागे वास्तवास होता. त्याच्या या अपघाताती निधनानंतर परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Married youth dies in an accident

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here