Home क्राईम Murder:  मित्रानेच केला मित्राचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळुन खून

Murder:  मित्रानेच केला मित्राचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळुन खून

Pune Crime: पैशाच्या वादातून मित्रानेच मित्राचा खून (Murder) केल्याची घटना. डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण नंतर नायलॉनच्या दोरीने त्याचा गळा आवळुन खून, पैशांवरुन वाद.

The friend Murder the friend by strangling him with a nylon rope

पुणे:  बऱ्याचदा वैयक्तित कारणांवरुन गंभीर गुन्ह्याच्या घटना घडत  आहेत. गुरुवारी मध्यरात्री असाच काहीसा प्रकार पुण्याच्या आंबेगावमध्ये घडला आहे. पैशाच्या वादातून मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना समोर आली आहे.

मध्यरात्री घडलेल्या हत्येनंतर पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैशांसाठी मित्रानेच मित्राचा खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. राहुल दांगड असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून आरोपी सुशांत आरुडे याने हा खून केला असल्याची माहिती समोर आली आहे. हत्येनंतर आरोपी सुशांतने पळ काढला होता. मात्र पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला अटक केली आहे.

गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजता आरोपी सुशांतने पैशांवरुन वाद झाल्यानंतर राहुलच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीत राहुलचा मृत्यू झाला. राहुलच्या हत्येनंतर सुशांतने तिथून पळ काढला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हत्येनंतर नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालय.

मृत्यू झालेल्या राहुल दांगट याचा शेतीचा व्यवसाय होता.  राहुला आणि सुशांत आरुडे या दोघांमध्ये पैशांच्या देवाण घेवाणीवरुन वाद झाले होते. यावरुनच गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये धुसफूस होता. गुरुवारी मध्यरात्री आरोपी सुशांतने भारती विद्यापीठच्या मागे पॉकेट कॉर्नर येथे राहणाऱ्या राहुल दांगट याच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका टोकाला पोहोचला की, आरोपीने राहुलच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. यानंतर नायलॉनच्या दोरीने त्याचा गळा आवळुन खून केला.

आरोपीला आज न्यायालयात हजर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे,” अशी माहिती भारतीय विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट दिली.

Web Title: The friend Murder the friend by strangling him with a nylon rope

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here