Home क्राईम क्रूरतेची परिसीमा: आईनेच पोटच्या चार वर्षीय मुलीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या

क्रूरतेची परिसीमा: आईनेच पोटच्या चार वर्षीय मुलीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या

Pune Crime: एका महिलेने आपल्या पोटच्या चार वर्षीय मुलीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली.  

the four-year-old girl was brutally murder by her mother by stabbing her with a knife

पुणे: क्रूरतेची परिसीमा गाठत एका महिलेने आपल्या पोटच्या चार वर्षीय मुलीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या  केली. पुण्यातील हडपसर भागात काल (27 मार्च) रात्री ही धक्कादायक घटना घडली. वैष्णवी महेश वाडेर असं हत्या झालेल्या चिमुकलीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सिद्धिविनायक दुर्वांकूर सोसायटी ससाणे नगरमध्ये सोमवारी (27 मार्च) रात्री सव्वा नऊच्या सुमारास ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही तिच्या चार वर्षीय मुलीसोबत एकटीच राहत होती. काही दिवसांपूर्वीच ही या ठिकाणी राहायला आली होती. ती बेकरी प्रॉडक्ट विक्रीचा व्यवसाय करत होती. सोमवारी ती भाड्याचे घर खाली करणार होती. यासाठी घरमालक तिथे गेले होते. त्यावेळी तिने दरवाजा आतून बंद करुन घेतला होता. घर मालकाने दरवाजा ठोठावूनही महिलेने दरवाजा उघडला नाही. अखेर शेजारच्यांनी महिलेला दरवाजा उघडण्यास सांगितलं. दरम्यान यानंतर महिलेने दरवाजा उघडला. घरमालक आणि शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिलं असता मुलीचा मृतदेह आढळून आला. चार वर्षीय चिमुकलीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. त्यांनी तात्काळ याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे. तर आरोपी महिला कल्पना वाडेर हिला ताब्यात घेण्यात आलं आहे. सादर महिलेने का चिमुकलीची हत्या केली कारण अद्याप समोर आले नाही. याप्रकरणी हडपसर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: the four-year-old girl was brutally murder by her mother by stabbing her with a knife

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here