Home Accident News अहमदनगर ब्रेकिंग: कंटेनर व टेम्पोचा भीषण अपघात; चालकाचा हात तुटला

अहमदनगर ब्रेकिंग: कंटेनर व टेम्पोचा भीषण अपघात; चालकाचा हात तुटला

Ahmednagar News: झगडे फाट्याच्या पश्चिमेला खडकी नदीजवळ ट्रक कंटेनर व आयशर टेम्पो दोघांची समोरासमोर धडकून भीषण अपघात (Accident).

accident of container and tempo The driver's arm was broken

कोपरगाव | Kopargaon:  कोपरगाव तालुक्यातील घारी ग्रामपंचायत हद्दीत झगडे फाट्याच्या पश्चिमेला खडकी नदीजवळ ट्रक कंटेनर व आयशर टेम्पो दोघांची समोरासमोर धडकून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात काल सकाळी ०६ ते ६.३० दरम्यान घडला.  या अपघातात टेम्पो चालकाचा उजवा हात कोपरापासून तुटून पडल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी की, एम एच ४७ ए एस ३८७४ हा आयशर टेम्पो झगडे फाट्याकडे चाललेला होता व समोरून झगडे फाट्याच्या दिशेने देर्डे फाट्याकडे विरुद्ध बाजूने जाणारा ट्रक कंटेनर क्र एम एच ४३ यू ७१५५ येत होता. कंटेनर विरुद्ध बाजूने येत असल्यामुळे आयशर टेम्पो चालकाला त्याचा अंदाज आला नाही व त्यांची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचा चक्कासुर झाला आहे व आयशर टेम्पोच्या चालकाचा उजवा हात कोपरापासून तुटून पडलेला असल्याचे समजले. कलाम शेख असे चालकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदर कंटेनरमध्ये बियरच्या बाटल्या भरलेल्या होत्या व आयशर टेम्पो गाडीत भंगार माल भरलेला होता. बराच वेळ वाहतूक खोळंबली होती. दरम्यान घटनास्थळी तातडीने पोलिसांनी भेट दिली. दोन्हीही गाड्यांचे चालक बेशुद्ध अवस्थेमध्ये होते. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल आर डी शेख, आर. के. आरवडे वाहतूक शाखेचे पो ना भगवान ढाका, पो कॉ प्रकाश नवाळी, गृह रक्षक दलाचे जवान अंकुश आहेर यांनी जखमींना पुढील उपचारासाठी कोकमठाण येथील एस जे एस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती दिली.

Web Title: accident of container and tempo The driver’s arm was broken

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here