Home अहमदनगर अहमदनगर: कंपनीत मशीनमध्ये दबल्याने तरुण कामगाराचा मृत्यू

अहमदनगर: कंपनीत मशीनमध्ये दबल्याने तरुण कामगाराचा मृत्यू

Ahmednagar News: सुपा एमआयडीसीमधील बॉक्सोव्हिया कंपनीत मशीनमध्ये दबल्याने तरुण कामगाराचा मृत्यू (Death) झाल्याची घटना.

young worker death after being crushed by a machine in the company

पारनेर | Parner:  पारनेर तालुक्यातील विस्तारित सुपा एमआयडीसीमधील बॉक्सोव्हिया कंपनीत मशीनमध्ये दबल्याने तरुण कामगाराचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि. २८) सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली. भरत कचरू काळे (रा. अस्तगाव, ता. पारनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे.

भरत काळे हा मंगळवारी सकाळी कंपनीत मशीनवर काम करत असताना मशीनमध्ये दबून त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर नागरिकांनी कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ गर्दी केली होती. कंपनी व्यवस्थापनाने मयताच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. कंपनीचे व्यवस्थापक प्रीतम जकाते यांनी उपस्थित मयत कामगारांच्या नातेवाइकांना मदतीचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. याप्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉस्टेबल बी. बी. रेपाळे हे करत

Web Title: young worker death after being crushed by a machine in the company

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here