Home अहमदनगर Fraud Case: शेतकऱ्याला १४ लाखांना गंडा, दोन व्यापाऱ्यांना अटक

Fraud Case: शेतकऱ्याला १४ लाखांना गंडा, दोन व्यापाऱ्यांना अटक

Fraud Case Farmer robbed of Rs 14 lakh, two traders arrested

Ahmednagar Fraud | अहमदनगर: विकत घेतलेल्या संत्र्याचे पैसे बँक खात्यात जमा करत असल्याचे सांगत संत्रा उत्पादक शेतकऱ्याची १४ लाखांची फसवणूक  (Fraud) करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अमोल ज्ञानेश्वर फुटाणे रा. वरुड जि. अमरावती व मायनुल इस्लाम करीम इस्लाम रा. पश्चिम बंगाल असे अटक केलेल्या आरोपी व्यापाऱ्यांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील वाळकी येथील संत्रा उत्पादक शेकरी संदीप मधुकर तावरे यांनी पश्चिम बंगाल मधील व्यापाऱ्यास संत्री विकली. १४ लाख ५० हजारांचा त्यांचा व्यवहारत ठरले. त्यानंतर व्यापारी संत्रा ट्रक घेऊन आले. संत्रा तोडून तो त्यांनी ट्रकमध्ये भरला. संत्रा ट्रक भरून झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी १५ लाख ५० हजार रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यात आरटीजीएस केले. मात्र संत्र्याचा ट्रक महाराष्ट्र बाहेर पडल्याने शेतकऱ्यांचे बँक खाते व्यापाऱ्यांनी होल्ड केले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर शेतकरी संदीप तावरे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.  

Web Title: Fraud Case Farmer robbed of Rs 14 lakh, two traders arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here