Home संगमनेर Crime | संगमनेर: बोकड खरेदीत सहा लाखांची फसवणूक

Crime | संगमनेर: बोकड खरेदीत सहा लाखांची फसवणूक

Sangamner Fraud Crime:  बोकड खरेदी करण्याकरिता विश्वासाने दिलेल्या रकमेच्या बदल्यात बोकड न देता ६ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक.

Fraud of Rs 6 lakh in buck purchase

संगमनेर:  संगमनेर बोकड खरेदी करण्याकरिता विश्वासाने दिलेल्या रकमेच्या बदल्यात बोकड न देता ६ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करण्यात  आली. याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून. संगमनेर खुर्द येथील व्यक्तीविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अशोक शिंदे (रा. संगमनेर खुर्द, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गणेश धोंडिभाऊ नाईकरे (धंदा शेळीपालन, राजगुरूनगर, ता. ( खेड, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. नाईकरे यांचा शेळीपालनाचा व्यवसाय आहे.

त्यांती बोकड खरेदीसाठी शिंदे याला १ लाख ३० हजार, १ लाख 90 हजार आणि ३ लाख ८० हजार असे एकूण ६ लाख ६० हजार रूपये दिले होते. मात्र, वेळोवेळी मागणी करूनही शिंदे याने त्यांना बोकड दिले नाहीत. १७ डिसेंबर २०२० ते १ मार्च २०२२ या काळात हे पैसे दिल्याचे नाईकरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Fraud of Rs 6 lakh in buck purchase

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here