सर्वोद्य विद्या मंदिर, राजूर च्या विद्यार्थींनीना मोफत पासचे वाटप
राजूर: गु. रा. वि. पाटणकर सर्वोद्य विद्या मंदिर ज्यूनियर कॉलेज, राजूर या विद्यालयातील विद्यार्थीनींना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा तर्फे पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर ग्रामीण विद्यार्थींनी त्रैमासिक सवलतीचे मोफत पासचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी खास करून ग्रामीण विद्यार्थींनींसाठी या योजनेची सुरूवात केली आहे. या योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थीनींना या मोफत पासचे वाटप करण्यात आले.
या योजनेचा लाभ सर्वोद्य विद्या मंदिर मधील विद्यार्थींनींना मिळवून देण्यासाठी, विद्यार्थीनींना मार्गदर्शक श्री. घिगे बी. एस, श्री. मढवई आर. आर व श्री. अजित गुंजाळ सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर ग्रामीण विद्यार्थींनी त्रैमासिक पास ही योजना कॉलेज मध्ये कार्यरत करण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री. एम. डी. लेंडे व उपप्राचार्य श्री. पर्बत एल. पी यांनी मोलाचे मार्गदशर्न करत विद्यार्थींनींना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य केले.
Website Title: Free Pass Allocation Of Vidyarthi Mandir, University Of Rajur