शिरपुंजे आश्रमशाळेचा भोंगळा कारभार उघड: खा. लोखंडेंची अचानक भेट
राजूर: आदिवासी भागातील आश्रमशाळांच्या बेजबाबदार कारभाराची प्रचिती शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांना आली. शिरपुंजे आदिवासी आश्रम शाळेतील भोंगळा कारभार व विद्यार्थांना कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्याने मुख्याध्यापक व अधीक्षक यांच्या निलंबन ची मागणी केली आहे.
शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी शासकीय आश्रमशाळा शिरपुंजे येथे भेट दिली असता तेथील शाळेची अतिशय दयनीय अवस्था बघायला मिळाली यामुळे खासदार यांनी संताप व्यक्त करीत आश्रम शाळा कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली.
खासदार लोखंडे यांच्यासमोरच विद्यार्थी जेवनाचे ताट पावसाच्या साचलेल्या पाण्यात धुत होते. तर जेवनात फक्त भातवरण त्या वरणामध्ये कोबी मिक्स करून बनवलेले आढळले. शाळेच्या पिण्याच्या पाण्यात जंतु आढळले. लाईट नसल्याचे सांगत पिठ उपलब्ध नसल्याने आता जेवणामध्ये चपाती नाही असे सांगीतले परतु सदर कर्मचारी यांनी सुरुवातीला खासदार साहेबांना दिलेली माहिती व शिक्षकांनी दिलेली माहिती वेगवेगळी असल्यामुळे खासदार सदाशिव लोखंडे, जि.प सदस्य डॉ. किरण लहामटे, जी प गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी चांगलेच धारेवर धरले.
सदर आश्रम शाळेचा दहावीचा चालु वर्षाचा निकाल २४ टक्के लागल्याचा गावातील ग्रामस्थांनी सांगितले आहे. यामुळे खासदार साहेबांनी शेराबुकची मागणी केली असता टाळाटाळ करत तब्ब्ल एक तास उशिरा शेरा बुक देण्यात आले. धान्य कोठार तपासत असताना कर्मचारी सांगत होते साहेब ही डाळ शिजतचं नाही. अन तीच डाळ विद्यार्थ्यांना जेवणासाठी. भोपळा सोडून कोणत्याच भाज्या शिल्लक नव्हत्या. डाळ, तांदुळ व इतर कडधान्ये नमुने खासदार साहेबांनी आपल्या सोबत घेतले. व तपासणीसाठी पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाकडून कोट्यावधी रुपये आश्रम शाळांवर खर्च होतात परंतु विद्यार्थी सुविधा भेटत नसल्याने लवकरच राजूर प्रकल्पाच्या सर्वच आश्रम शाळांना भेट देणार असल्याचे सांगितले.
नाशिकचे आयुक्त व राजुरचे प्रकल्प आधिकारी यांना फोन करुन तात्काळ मुख्याध्यापक व अधिक्षक व संबंधितांना निलंबित करण्याचे आदेश दिले. आश्रम शाळेचा हा गुणवत्तेचा व सुविधेचा मुद्दा सरकार दरबारी अधिवेशनात मांडणार असल्याचे खासदार लोखंडे यांनी सांगितले.
Website Title: Sharpunje Ashram Shala Bhongla Declaration: Khana Sudden Visit To The Iron Ore