Home महाराष्ट्र वीज पडल्याने तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू, दोघे गंभीर जखमी

वीज पडल्याने तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू, दोघे गंभीर जखमी

सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे वीज पडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

पंतूसिंग जीवनसिंग रजपूत (वय ४०), संकेत शिवानंद चौरमोले (वय १७), पार्वती मलप्पा कोरे (वय ४४) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत तर रविकांत राजकुमार मुळे (वय ९३) व धरेप्पा लिंगप्पा म्हेत्रे (वय ९२) हे दोघे जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत महसुल विभागाने दिलेली माहिती अशी की, मंद्रुपपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मंद्रुप ते टाकळी रस्त्यालगतच्या दरेप्पा म्हेत्रे याच्या शेतात ही घटना घडली. पावसामुळे झाडाखाली अडोशाला खाली थांबलेले तिघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन शेतमजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. तर संपूर्ण मंद्रुप गावावर या वीज दुर्घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

Website Title: Three Unfortunate Deaths And Two Seriously Injured Due To Lightning

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here