Home महाराष्ट्र शासकीय दवाखान्यांमध्ये उपचार, तपासण्या मोफत

शासकीय दवाखान्यांमध्ये उपचार, तपासण्या मोफत

Tanaji Sawant: सार्वजनिक आरोग्य विभागाशी संलग्नित राज्यातील सर्व २ हजार ४१८ दवाखाने, आरोग्य संस्था यात सर्व प्रकारचे उपचार आणि तपासण्या मोफत राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.

Free treatment checkups in government hospitals

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाशी संलग्नित राज्यातील सर्व २ हजार ४१८ दवाखाने, आरोग्य संस्था यात सर्व प्रकारचे उपचार आणि तपासण्या मोफत करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. १५ ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय, अतिविशेषोपचार रुग्णालय, कर्करोग रुग्णालय या सर्वांमध्ये ही सवलत

याठिकाणी पूर्वी केसपेपर काढण्यासाठी आणि नंतर उपचारासाठी रुग्णांना बराच वेळ वाट पाहत बसावे लागत होते. आता हा वेळ वाचणार आहे. उपचारासाठी आलेल्या असेल.

जनतेला सर्व तपासण्या, रक्त चाचण्या, सर्व डायग्नोस्टिक सेवा अगदी मोफत मिळतील. रुग्णांना लवकरात लवकर उपचार मिळणार आहेत. – डॉ. तानाजी सावंत, आरोग्यमंत्री

Web Title: Free treatment checkups in government hospitals

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here