Home महाराष्ट्र नितीन देसाई आत्महत्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

नितीन देसाई आत्महत्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

Nitin Desai: नितीन देसाई यांनी २ ऑगस्ट रोजी एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Case against five people in Nitin Desai suicide case

अलिबाग: कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्याप्रकरणी ईसीएल फायनान्स कंपनी व एडलवाइज ग्रुपचे पदाधिकारी आणि इतर अशा पाच जणांविरोधात आत्महत्येस (Suicide) प्रवृत्त केल्याप्रकरणी खालापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई लेखी तक्रार दिली आहे.

नितीन देसाई यांनी २ ऑगस्ट रोजी एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांनी एनडी स्टुडिओसाठी ईसीएल फायनान्स कंपनीतर्फे कर्ज घेतले होते. परतफेडीसाठी कंपनीचे पदाधिकारी आणि इतरांनी तगादा सुरू होता. त्यामुळे त्यांनी गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला. त्यापूर्वी त्यांनी ऑडिओ क्लिपही बनविल्या होत्या.

नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा नितीन देसाई यांनी शुक्रवारी खालापूर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली. ईसीएल फायनान्स कंपनी, एडलवाइज ग्रुपचे पदाधिकारी यांनी कर्ज प्रकरणामध्ये वारंवार तगादा लावत मानसिक त्रास दिला. त्या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Case against five people in Nitin Desai suicide case

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here