संगमनेर: ‘जलजीवन मिशन’च्या योजनेतील ३० लाख रूपयांच्या पाईपांची चोरी
Sangamner News: जलजिवन मिशन या योजनेच्या ३० लाख ३ हजार ७८४ रूपये किमतीच्या पाईपांची चोरी (Theft) झाल्याची घटना.
संगमनेर: संगमनेर तालुक्यात चोरीचे सत्र सुरूच आहे. ३० लाख रूपये किंमतीचे हे पाईप कोणी चोरून नेले आहे असा प्रश्नही आता निर्माण झाला आहे. तालुक्यातील वेल्हाळे शिवारातील भांडमळा टाकीजवळ असलेल्या जलजिवन मिशन या योजनेच्या ३० लाख ३ हजार ७८४ रूपये किमतीच्या पाईपांची चोरी झाल्याची घटना शुक्रवार (३ जुलै) रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आर.एम कातोरे अॅड या कंपनीने निमगाव भोजापूर व इतर तीन गावांचे जलजिवन मिशन योजनेचे काम चालु असून त्यासाठी पाईप घेऊन ते वेल्हाळे शिवारातील भांडमळा टाकी जवळ ठेवले होते. मात्र हे सर्व पाईप चोरट्यांनी चोरून पोबारा केल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली आहे. एकूण ३० लाख ३ हजार ७८४ रूपये किंमतीचे पाईप होते.
याप्रकरणी अंकेत राजेंद्र वाकचौरे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जे.एन दहातोंडे हे करत आहे.
Web Title: theft of pipes worth 30 lakh rupees under the scheme of ‘Jaljeevan Mission’
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App