Home क्राईम मुलीचे पोट वाढत असल्याचे पाहून आईने चौकशी केली असता, धक्कादायक उघडकीस

मुलीचे पोट वाढत असल्याचे पाहून आईने चौकशी केली असता, धक्कादायक उघडकीस

Nagapur Crime: नागपूरमधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने प्रेयसीशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती चार महिन्यांची गर्भवती, प्रियकराने ‘तो मी नव्हेच,’ अशी भूमिका, प्रियकराविरुद्ध बलात्काराची (Rape) तक्रार, प्रियकराला अटक.

Frequent sexual intercourse with a lover Rape against lover case filed

नागपूर : प्रेम असल्याचे सांगून एका तरुणाने प्रेयसीशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती चार महिन्यांची गर्भवती झाली. मात्र, प्रियकराने ‘तो मी नव्हेच,’ अशी भूमिका घेतली. त्यामुळे चिडलेल्या तरुणीने कन्हान पोलीस ठाण्यात प्रियकराविरुद्ध बलात्काराची तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून प्रियकराला अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी की,  पीडित २० वर्षीय तरुणी कन्हानजवळील एका गावात राहते. तिची ओळख सप्टेंबर २०२२ मध्ये गावातील आरोपी विशाल गोपाळराव तिरकमठे (२३) याच्याशी झाली. त्याने तिच्याशी मैत्री वाढवली. घरी कुणी नसताना तो वारंवार तिच्या घरी येत होता.

यादरम्यान, त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला बाहेर फिरायला घेऊन गेला. त्याने जंगलात नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तो वारंवार तिला बाहेर नेत होता. तसेच घरी कुणी नसताना तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता. यातून ती गर्भवती राहिली. चार महिन्यांची गर्भवती झाल्यामुळे तिचे पोट वाढल्याचे आईच्या लक्षात आले. आईने तिला विचारणा केली असता तिने प्रियकर विशाल तिरकमठे याचे नाव सांगितले. तो लग्न करणार असल्याचेही सांगितले. त्यामुळे तिच्या आईने विशालला घरी बोलावले. मात्र, प्रियकराने ‘त्या बाळाचा बाप मी नव्हेच’ अशी भूमिका घेतल्याने तरुणी रडायला लागली. आईने मुलीसह कन्हान पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून विशालविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली.

Web Title: Frequent sexual intercourse with a lover Rape against lover case filed

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here