अहमदनगर हादरले! सूनेचा गळा आवळून खून; दोन वर्षाच्या नातीचा बादलीत बुडवून खून, सास-यास अटक
Ahmednagar News: शारीरिक सुखासाठी सासऱ्याने गरोदर सुनेचा गळा दाबून तर चिमुकल्या नातीचा पाण्यात बुडवून खुन (Murder) केल्याची खळबळजनक घटना.
शेवगाव: एका कुटुंबात सास-याने सूनेचा आणि नातीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. शारीरिक सुखासाठी सासऱ्याने गरोदर सुनेचा गळा दाबून तर चिमुकल्या नातीचा पाण्यात बुडवून खुन केल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे
ऋतुजा संतोष लोंढे आणि चिमुकली समृद्धी संतोष लोंढे असे घटनेतील मृतांची नावे आहेत. पोलिसांनी ऋतुजा यांचे सासरे ज्ञानदेव लोंढे यांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर शेवगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे शेवगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चारित्राच्या संशयावरुन ही घटना घडली आहे.. ही घटना शेवगाव तालुक्यातील मजले शहर येथे घडली. घटनास्थळावरुन आणि पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार सासऱ्याने गळा दाबून युवतीचा आणि चिमुकलीचा पाण्यात टाकून खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. पोलिस घटनेचा तपास करीत आहेत
शारीरिक सुखासाठी सासऱ्याने गरोदर सुनेचा गळा दाबून तर चिमुकल्या नातीचा पाण्यात बुडवून खुन केल्याची खळबळजनक घटना घडली. शेवगाव तालुक्यातील मजलेशहर येथे गुरुवारी सांयकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घटना घडली असून पोलिसांनी नराधम सासऱ्यास अटक केली आहे.
मजलेशहर येथील ऋतुजा संतोष लोढे (वय २२) हिचा गळा दाबून तर नात समृद्धी संतोष लोढे (वय २ वर्ष) या चिमुकलीचा बकेटच्या पाण्यात बुडवून सारा कारभारी ज्ञानदेव लोढे (वय ६२ रा. मजलेशहर) याने खुन केल्याची घटना ६ एप्रिल रोजी सांयकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मयत ऋतुजाचे चुलते जनार्धन नारायण मगर (रा. मजलेशहर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कारभारी ज्ञानदेव लोढे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. मयत ऋतुजा ही पाच महिन्याची गरोदर होती.
तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन सासरा कारभारी हा तिच्याकडे सहा महिन्यापासून शारीरिक सुखाची मागणी करत होता. ६ एप्रिल रोजी सांयकाळी ५ : ४५ वाजता फिर्यादीचा मुलगा विशाल याने आपल्या वडिलांना फोन करून ऋतुजा आणि समृद्धी बेशुद्ध अवस्थेत ओट्यावर पडल्याचे सांगितले. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे असलेला त्यांचा पुतण्या ऋषिकेश यांनी त्यांना सांगितले की, ऋतुजाला भविनिमगाव येथे यात्रेस घेऊन जाण्यासाठी आलो असता, ती बाहेर ओट्यावर पडलेली होती. तर तिचा सासरा कारभारी याने समृद्धीला पाण्याने भरलेल्या बकेटमध्ये बुडवून दाबून ठेवले होते. मी पळत जाऊन समृद्धीस सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सासऱ्याने तिला ओट्यावर फेकुन दिले. मी आरडाओरड केल्याने घरातील सगळे बाहेर आले. त्यानंतर दोघींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले’. मात्र दुर्दैवाने दोघीही माय-लेकी मृत असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी जाहीर केले. याबाबत सासरा कारभारी लोढे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: physical pleasure, father-in-law strangles pregnant daughter-in-law and murder infant cousin
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App