Home क्राईम संगमनेरात जुगार अड्ड्यावर छापा,  ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

संगमनेरात जुगार अड्ड्यावर छापा,  ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

Sangamner Raid: जुगार अड्ड्यावर संगमनेर शहर पोलिसांनी छापा टाकून 11 जणा विरुद्ध गुन्हा दाखल.

Gambling den raid in Sangamner, case registered against 11 people

संगमनेर: संगमनेर शहरातील जुन्या पुणे नाशिक महामार्ग वर असलेल्या जुगार अड्ड्यावर संगमनेर शहर पोलिसांनी छापा टाकून १६ जणा विरुद्ध गुन्हा दाखल केला करण्यात आला आहे.

संगमनेर  शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांची  मालिका जुगार अड्यापर्यंत येऊन पोहोचली आहे अवैध गोवंश कारखाना बरोबरच मटका गाजा विक्री आणि गुटख्यासह जुगाराची संगमनेर मध्ये चलती असल्याचे उघड झाले आहे.

संगमनेर शहर अंतर्गत  असणाऱ्या पुणे नाशिक रोडवर लकी हॉटेल शेजारील पांढऱ्या रंगाच्या बिल्डिंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या हॉलमध्ये संगमनेर पोलिसानी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास छापा घालून अकरा जुगाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अर्जुन गोड (इंदिरानगर गल्ली नंबर २) शुभम हिरामण शिंदे सचिन बंडू मंडलिक ( खांडगाव ता संगमनेर) गणेश बारकू धामणे (रा. इंदिरानगर, संगमनेर पठीण सहदेव जगदाळे (रा गोल्डन सिटी सगमनेर) निलेश अशोक काळे (रा कोल्हेवाडी रोड, संगमनेर)) रवींद्र देवराम मस्के (रा मालदार रोड, संगमनेर) प्रतीक जुगलकिशोर जाजू (रा. गणेशनवार, संगमनेर) दीपक सुभाष फटांगरे (रा. गणेशनगर संगमनेर) राहुल सुरेश शिंदे (रा. शिवाजीनगर संगमनेर) आणि सनी गौरव पवार (रा मानंदार रोड संगमनेर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत

पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ५ लाख ४७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे त्यामध्ये १ लाख २१ हजार ५०० रुपये रोख रक्कम 3 लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार क्रमांक एमएच १७ एंड्रोड -300, 3 हजार रुपये किमतीची पेंशन मोटार सायकल क्रमांक एमएच १७ एए ८०५२८ हजार रुपये किमतीची कावासाकी मोटरसायकल क्रमांक एमएच १५ एक्स ४३८८, ३० हजार रुपये किमतीची पेंशन मोटर सायकल क्रमांक एमएच १७ बीएच ५०२६० हजार रुपये किमतीची पल्सर मोटार सायकल क्रमांक एमएच १४ बी.ई ६८४३ अशी जप्त केलेल्या मुद्देमालाची यादी आहे.

पोलीस नाईक यमना नामदेव जाधव, संगमनेर शहर पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव हे करत आहेत.

Web Title: Gambling den raid in Sangamner, case registered against 11 people

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here