Home क्राईम पतीचे अपघातात निधन, दोन महिन्यांनी दिराचा जबरदस्ती अत्याचार, घरी सांगितलं पण…

पतीचे अपघातात निधन, दोन महिन्यांनी दिराचा जबरदस्ती अत्याचार, घरी सांगितलं पण…

Sexually Abused दिराने ३५ वर्षीय महिलेवर जबरदस्तीने अत्याचार (Raped).

Husband dies in an accident, Dira is forcibly raped two months later

परभणी: पतीचे अपघातात निधन झाल्यानंतर दोन महिन्यांनी दिराने ३५ वर्षीय महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना परभणी शहरातील काद्राबाद प्लॉट येथून समोर आली आहे. दिराने अत्याचार केल्यावर हा प्रसंग सासऱ्याला सांगितला असता सासऱ्याने विधवा महिलेला मारहाण केली. त्यानंतर सासू व नणंद यांना देखील ही बाब सांगितली. मात्र त्यांनी देखील  “घरातलाच व्यक्ती आहे तो जे करत आहे ते करु दे” असं म्हणत विधवा सुनेला संबंध ठेवण्यास भाग पाडले. या प्रकरणी नानालपेठ पोलीस ठाण्यामध्ये चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधवा विवाहित महिलेला लॉजवर घेऊन जाऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दिराने स्वतःच्या पत्नीच्या आधार कार्डवर विधवा विवाहित महिलांचा फोटो लावला. आणि लॉज धारकाला आपण पती-पत्नी असल्याचं सांगून रुम घेऊन महिलेवर अत्याचार केला असल्याचे देखील महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे.

परभणी शहरातील काद्राबाद प्लॉट भागामध्ये राहणाऱ्या एका ३५ वर्षीय विवाहित महिलेचा नवऱ्याचा अपघातामध्ये मृत्यू झाला. सदरील महिला आपल्या घरी राहत असताना दोन महिन्यानंतर दिराने महिलेला “मी तुम्हाला खूप पसंत करतो, तुमचा पती वारला तर काय झालं, मी आहे ना”, असं म्हणत पीडितेसोबत जवळकी साधत जबरजस्तीने शारीरिक संबंध ठेवले. हा प्रकार घडल्यानंतर विधवा विवाहित महिलेने अपल्या सासर्‍याला घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यावेळी सासऱ्याने महिलेला मारहाण करुन गप्प राहण्यास सांगितले.

त्यानंतर महिलेने सासूला आणि ननंद यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. मात्र, त्यांनी देखील विधवा सुनेला संबंध ठेवण्यास भाग पाडले. यानंतर महिलेचा दिर घरात आल्यानंतर महिलेच्या मुलाला आणि मुलीला नातेवाईक घराबाहेर घेऊन जाऊन महिलेला दिरासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी सोडून देत होते. यासोबतच महिलेची इच्छा नसताना दिराने लॉजवर नेऊन महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले. महिलेने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने महिलेच्या मुलाला आणि मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेने घडलेला संपूर्ण प्रकार कोणाला सांगू नये यासाठी दिराने महिलेच्या मुद्रांकावर स्वाक्षऱ्या बळजबरीने घेतल्या. अखेर या प्रकाराला कंटाळलेल्या माहिलेने नानालपेठ पोलीस ठाणे गाठून दिलेल्या तक्रारीवरुन दीर, सासरा, सासू आणि ननंद या चार जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Husband dies in an accident, Dira is forcibly raped two months later

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here